चार प्रेयसींना गिफ्ट देणं पडलं महागात अन् भामट्याला जावं लागलं तुरुंगात!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 12:11 PM2020-01-14T12:11:06+5:302020-01-14T12:18:23+5:30

सर्सास महिलांच्या पर्सची चोरी करत होता

Man Turned Thief For Gifting Expensive Articles To His Four Girlfriends | चार प्रेयसींना गिफ्ट देणं पडलं महागात अन् भामट्याला जावं लागलं तुरुंगात!

चार प्रेयसींना गिफ्ट देणं पडलं महागात अन् भामट्याला जावं लागलं तुरुंगात!

Next

आग्रा : पोलिसांनी पर्स चोरी करणाऱ्या एका भामट्याला अटक केली आहे. हा भामटा आपल्या चार प्रेयसींना महागड्या पर्स गिफ्ट देण्यासाठी चोरी करत होता. त्याच्याकडून चोरी करण्यात आलेल्या तीन पर्स, अपाचे बाईक आणि दोन मोबाइल जप्त करण्यात आले आहे. चोरी केल्याप्रकरणी त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. 

हरीपर्वत पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक अजय कौशल यांनी सांगितले की, येथील एक महिला आपल्या दिरासोबत घरी जात होती. त्यावेळी एनएच-2 वर नेहरूनगरजवळ पाठिमागून आलेल्या दुचाकीस्वाराने या महिलेची पर्स लुटली होती. या घटनेची तक्रार करण्यात आल्यानंतर या आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. 

पोलिसांच्या माहितीनुसार, विष्णू चौहान असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्या चार प्रेयसी असल्याचे त्याच्या चौकशीतून समोर आले. विशेष म्हणजे, या आरोपी ज्यावेळी प्रेयसींना भेटण्यासाठी जात असे, त्यावेळी त्यांना गिफ्ट घेऊन जात होता. गिफ्ट खरेदी करण्यासाठी पैसे नसल्यामुळे तो चोरी करत होता. सर्सास महिलांच्या पर्सची चोरी करत होता. हायवेवर सीसीटीव्ही नसल्यामुळे येथून येणाऱ्या महिलांच्या पर्स चोरून पळ काढत होता. 

विष्णू चौहान हा आठवड्यात दोन तरी चोऱ्या करत होता. मात्र, अनेकवेळा त्याने केलेल्या चोरीची तक्रार दाखल झाली नसल्यामुळे पोलिसांजवळ याबाबत माहिती नाही आहे. पोलिसांनी विष्णू चौहान या चोरट्याला पालीवाल पार्कमधील सुलभ शौचालयाजवळ पकडले होते. यावेळी त्याच्याकडील तीन पर्स जप्त केल्या. तसेच, त्याठिकाणी त्याने चोरी केलेली अपाचे बाईक सुद्धा सापडली. याआधी 2017 मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्याने आठ चोऱ्या केल्याचे उघड झाले होते.   

Web Title: Man Turned Thief For Gifting Expensive Articles To His Four Girlfriends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.