ऐकावं ते नवलच! गर्लफ्रेंडची हौस पुरवण्यासाठी पठ्ठ्याने चक्क भावाची म्हैस चोरली

By पूनम अपराज | Updated: January 4, 2021 22:07 IST2021-01-04T21:56:20+5:302021-01-04T22:07:15+5:30

Robbery : म्हैस विकण्यापूर्वी पोलिसांनी त्याला अटक केली.

Man stolके brother's buffalo to satisfy his girlfriend's lust | ऐकावं ते नवलच! गर्लफ्रेंडची हौस पुरवण्यासाठी पठ्ठ्याने चक्क भावाची म्हैस चोरली

ऐकावं ते नवलच! गर्लफ्रेंडची हौस पुरवण्यासाठी पठ्ठ्याने चक्क भावाची म्हैस चोरली

आग्रा जिल्ह्यातील खंदौली भागात एका युवकाने आपल्या प्रेयसीची हौस पूर्ण करण्यासाठी कुटुंबातील भावाची म्हैस चोरली. मात्र, म्हैस विकण्यापूर्वी पोलिसांनी त्याला अटक केली. यानंतर आरोपीला तुरूंगात पाठविण्यात आले. आरोपीचे कारनामे उघडकीस आल्यावर कुटुंबीय आश्चर्यचकित झाले. खंदौली पोलीस ठाणे हद्दीतील मालीपुरा गाव येथील रहिवासी अमित राठौर हा जवाहरसिंग यांचा मुुलगा आहे. त्याच्या शनिवारी रात्री घराबाहेर पडलेल्या म्हशीची चोरी झाली. पीडित महिलेने खंदौली पोलिस ठाण्यात म्हैस गुुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपास केला असता, गावच्या हरिपाल उर्फ छोटीने म्हैैैस चोरी केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी हरिपाल हा संबंधातील पीडित अमित राठोडचा भाऊ असल्याचे उघड़ झाले. आरोपी दोन किमी अंतरावर असलेल्या नगला हर्सुख गावात चोरीला गेलेली यला म्हैस विकायल गेला होता. माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. म्हैस सापडली आणि पीडित अमितच्या ताब्यात दिली. अमितने सांगितले की, त्याचे वडील आजारी आहेत. लखनौमध्ये दाखल आहे. त्यांचे कुटुंबातील सदस्य आहेत. याचा फायदा घेत आरोपीने रात्री म्हशी चोरून नेल्या. स्टेशन प्रमुख खंडौली पोलिस ठाणे अरविंद कुमार निर्वाल यांनी सांगितले की, आरोपी हरिपालच्या पत्नीचा सहा वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. यानंतर त्याचे एका महिलेशी प्रेम झाले, तिने त्याच्याकडे 20 हजार रुपयांची मागणी केली होती. पैसे देण्यासाठी त्याने म्हशी चोरून नेल्या. आरोपीला तुरूंगात पाठविण्यात आले आहे.

Web Title: Man stolके brother's buffalo to satisfy his girlfriend's lust