पतीने पत्नीवर ३०० वेळा चाकूने केले सपासप वार, मुलगी म्हणाली - 'माझा बाप बाप नाही सैतान आहे'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 15:08 IST2021-04-10T15:07:27+5:302021-04-10T15:08:37+5:30
मिररमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, दोषीचं नाव जॉर्ज लेदर आहे. तर त्याचं वय ६० वर्षे आहे. जॉर्जची मुलगी कोर्टात म्हणाली की, तिचा बाप सैतान आहे.

पतीने पत्नीवर ३०० वेळा चाकूने केले सपासप वार, मुलगी म्हणाली - 'माझा बाप बाप नाही सैतान आहे'
यूनायटेड किंगडमच्या लिवरपूलमध्ये हत्येची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने आपल्या पत्नीवर अत्याचाराची सीमा पार केली. या हैवानाने पत्नीच्या चेहऱ्यावर चाकूने तब्बल ३०० वेळा वार केले. या घटनेनंतर दोषीच्या मुलीने त्याला वडील मानण्यास नकार दिला.
मिररमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, दोषीचं नाव जॉर्ज लेदर आहे. तर त्याचं वय ६० वर्षे आहे. जॉर्जची मुलगी कोर्टात म्हणाली की, तिचा बाप सैतान आहे. मी माझ्या पित्याला पिता मानत नाही. त्याने माझ्या आईवर ३०० वेळा वार केलेत.
मुलगी म्हणाली की, जॉर्जने माझ्या आईचं जगणं मुश्कील करून टाकलं होतं. तो तिला फार जास्त त्रास देत होता. आईचा जीव घेतल्यावर त्याला जराही दु:खं नव्हतं. घरात आईचा मृतदेह पडला होता. आम्ही सगळे रडत होतो आणि जॉर्ज बाथरूम आरामात शॉवर घेत होता. (हे पण वाचा : धक्कादायक! प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, महिलेचा प्लॅन पाहून चक्रावून गेले पोलीस!)
लिवरपूल कोर्टात सुनावणी दरम्यान सांगण्यात आलं की, आरोपीला संशय होता की, त्याच्या पत्नीचं दुसऱ्या व्यक्तीसोबत अफेअर सुरू आहे. दुसऱ्या व्यक्तीवर तिचं प्रेम आहे. मृत महिला ही ३ मुलांची आई होती आणि तिचं वय ५६ वर्षे होतं. दरम्यान दोषी जॉर्जच्या चौकशी दरम्यान त्याने आपला गुन्हा मान्य केला होता. त्याने हे कृत्य १६ नोव्हेंबर २०२० मध्ये केलं होतं. (हे पण वाचा : ‘तुम्हारे सिवा मेरा ईस दुनियामें कौन', असे म्हणत महिलेने कपडे काढले अन्...)
सुनावणी दरम्यान न्यायाधीश म्हणाले की, हत्येची ही घटना फारच वाईट आहे. याची जेवढी निंदा करावी तेवढी कमी आहे. दोषी जॉर्जने आपल्या पत्नीला फारच वेदनादायी मृत्यू दिला. कोर्टाने जॉर्जला दोषी ठरवल्यानंतर शुक्रवारी जन्मेठेपेची शिक्षा सुनावली. तसेच असा आदेशही दिला आहे की, १८ वर्षापर्यंत दोषी पॅरोलवर बाहेर येऊ शकत नाही.