खुल्या जागेत फेकण्यात आले शस्त्रक्रीयेनंतरचे माणसांचे अवयव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2018 09:18 PM2018-10-27T21:18:24+5:302018-10-27T21:18:40+5:30

हे अवयव कुठल्यातरी इस्पितळाने अथवा लॅबोरेट्रीने येथे फेकले असावे असा प्रथम अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत असला तरी हे कृत्य कोणी केले आहे. याचा पोलीस सध्या तपास करीत आहेत. जर हे अवयव योग्यरित्या नष्ट न करता कोणी जाणून - बुजून खुल्या जागेत फेकले आहेत.

Man-made organisms thrown in the open space | खुल्या जागेत फेकण्यात आले शस्त्रक्रीयेनंतरचे माणसांचे अवयव

खुल्या जागेत फेकण्यात आले शस्त्रक्रीयेनंतरचे माणसांचे अवयव

googlenewsNext

वास्को - शस्त्रक्रियेनंतरचे अवयव प्लास्टिक डब्यात घालून आज दुपारी वेर्णा औद्योगिक वसाहतीतील खुल्या जागेत फेकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खुल्या जागेत १५ ते २० डब्यात अवयव घालून फेकण्यात आल्याची माहिती मायणा - कुडतरी पोलीसांना मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर दाखल होऊन या हलगर्जीपणाचा हा प्रकार कोणी केला आहे याबाबत त्यांच्याकडून चौकशी चालू करण्यात आली आहे.
शनिवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास वेर्णा औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका कंपनीच्या समोरील खुल्या जागेत डब्यात बंद करून माणसाचे विविध अवयव फेकण्यात आल्याची घटना समोर आली. कचरा उचलणारे काही लोक या भागात फिरत असताना त्यांना येथे प्लास्टिक डबे इतरत्र पडल्याचे दिसून येताच त्यांपैकी एक त्यांनी नेण्यासाठी उचलला असता यात अवयव असल्याचे त्यांना लक्षात आले. या प्रकाराबाबत पोलिसांना कळवण्यात येताच मायणा - कुडतरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रवीणकुमार वस्त, वेर्णा पोलीस निरीक्षक निनाद देऊळकर यांनी इतर पोलिसांसहीत त्वरित घटनास्थळावर धाव घेतली. औद्योगिक वसाहतीत अशा प्रकारे खुल्या जागेत अवयव फेकण्यात आल्याचे जवळपास राहणाऱ्या नागरीकांना कळताच याबाबत त्यांच्यातही संतापाचे वातावरण पसरले. या प्रकरणाचा तपास करत असताना त्या डब्यावर रुग्णाचे नाव, इस्पितळाचा कोड नंबर, रुग्णाची तपासणी करणाऱ्या डॉक्टरचे नाव तसेच कुठल्या वर्षी हा अवयव काढण्यात आलेला आहे याबाबत माहीती नमूद असलेली चिठ्ठी असल्याचे दिसून आले. फेकण्यात आलेल्या ह्या अवयवापैंकी काही अवयव २०१४ साली शस्त्रक्रीया करून काढलेल्यापैंकी असल्याचे पोलीसांना तपासाच्या दरम्यान समजल्याचे सूत्रांनी कळविले. शस्त्रक्रीया करून काढलेले हे अवयवांची योग्यरित्या विल्हेवाट न लावता अशा प्रकारे फेकण्यात आल्याने हा प्रकार कोणी केला आहे. याबाबत चौकशी चालू करण्यात आल्याची माहिती निरीक्षक वस्त यांनी दिली. अवयव कधी फेकण्यात आले आहे. याबाबत समजू शकले नसले. तरी शुक्रवारी उशिरा रात्री कुठल्यातरी वाहनाने हे अवयव येथे आणल्यानंतर फेकण्यात आले असावे असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
हे अवयव कुठल्यातरी इस्पितळाने अथवा लॅबोरेट्रीने येथे फेकले असावे असा प्रथम अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत असला तरी हे कृत्य कोणी केले आहे. याचा पोलीस सध्या तपास करीत आहेत. जर हे अवयव योग्यरित्या नष्ट न करता कोणी जाणून - बुजून खुल्या जागेत फेकले आहेत. तर त्याच्यावर असलेली माहिती त्यांच्याकडून काढली असती. मात्र, तसे करण्यात आले नसल्याने कोणाचे नाव बदनाम करण्यासाठी हा प्रकार केला असावा असा संशयही तपास करणाऱ्या यंत्रणाकडून सध्या व्यक्त केला जात आहे. अवयवांची योग्यरित्या विल्हेवाट न लावता ते येथे अशा प्रकारे खुल्या जागेत कोणी फेकले याचा सध्या तपास चालू असल्याचे पोलीस निरीक्षक वस्त यांनी सांगून हे कृत्य केलेल्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात येणार अशी माहीती त्यांनी दिली.
 

Web Title: Man-made organisms thrown in the open space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.