...म्हणून त्याने बंदुकीने ‘तिच्या’ पिलाला ठार मारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 09:07 IST2021-10-22T09:05:23+5:302021-10-22T09:07:44+5:30

मांजरीने कोंबडीच्या पिलाची शिकार केल्याने हेमराज सोनवणे याने बंदुकीने गोळी झाडत मांजरीच्या पिलास ठार केल्याची घटना गुरुवारी जिजाऊ नगरात घडली. पोलिसांनी हेमराज याला बंदुकीसह ताब्यात घेतले आहे.

man killed kitten with gun after cat kills chick | ...म्हणून त्याने बंदुकीने ‘तिच्या’ पिलाला ठार मारले

...म्हणून त्याने बंदुकीने ‘तिच्या’ पिलाला ठार मारले

जळगाव :  मांजरीने कोंबडीच्या पिलाची शिकार केल्याने हेमराज सोनवणे याने बंदुकीने गोळी झाडत मांजरीच्या पिलास ठार केल्याची घटना गुरुवारी जिजाऊ नगरात घडली. पोलिसांनी हेमराज याला बंदुकीसह ताब्यात घेतले आहे.

पुष्पराज प्रमोद बाणाईत या तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घराशेजारी हेमराज सोनवणे हा फोटोग्राफर वास्तव्याला आहे. त्याने कोंबड्या पाळल्या आहेत. गुरुवारी दुपारी  बाणाईत यांच्या मांजरीने हेमराजच्या कोंबडीच्या पिलाची शिकार केली. त्यामुळे चिडलेल्या हेमराजने घरातून बंदूक आणून मांजरीचा शोध घेतला. मात्र, मांजरीऐवजी तिचे पिलू दिसले. त्याने बंदुकीतून गोळी झाडून मांजरीच्या पिलाला ठार केले.

मी तसाच आहे...
या घटनेनंतर पुष्पराज व त्याची आई सुरेखा यांनी हेमराज याला मुक्या प्राण्याला का ठार मारले. तू नेहमीच असा त्रास देतो, तुझ्या अनेक चुकांकडे आम्ही दुर्लक्ष करतो, असे बोलत असताना, मी तसाच आहे, दुसऱ्या मांजरीलाही मारणार आहे. तुम्हाला काय करायचे ते करा, असे हेमराज याने हसत- हसतच उर्मटपणे उत्तर दिले. त्यानंतर पुष्पराज याने रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Web Title: man killed kitten with gun after cat kills chick