धक्कादायक! आधी प्रेयसीचा खून, काही दिवसांत दुसरं लग्न; मग पत्नीला दागिने देण्यासाठी सराफाची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 10:50 IST2021-06-04T10:49:40+5:302021-06-04T10:50:28+5:30

दुसऱ्या पत्नीला दागिने देण्यासाठी सराफाचाच खून केला अन्‌ राहुरीच्या घटनेला वाचा फुटली

man killed girlfriend then does second marriage kills jeweller ‍ | धक्कादायक! आधी प्रेयसीचा खून, काही दिवसांत दुसरं लग्न; मग पत्नीला दागिने देण्यासाठी सराफाची हत्या

धक्कादायक! आधी प्रेयसीचा खून, काही दिवसांत दुसरं लग्न; मग पत्नीला दागिने देण्यासाठी सराफाची हत्या

राहुरी (जि. अहमदनगर) : शिरुर कासार (जि. बीड) येथील सराफाचा खून करणाऱ्या आरोपीनेच राहुरी फॅक्टरी येथे १४ मार्च रोजी मध्यरात्री प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची माहिती समोर आली आहे. प्रेयसीच्या खुनानंतर आरोपीने काही दिवसांतच दुसरे लग्न केले. दुसऱ्या पत्नीला दागिने देण्यासाठी सराफाचाच खून केला अन्‌ राहुरीच्या घटनेला वाचा फुटली. आरोपी ज्ञानेश्वर मूळचा भातकुडगाव (ता. शेवगाव) येथील रहिवासी आहे. 

ज्ञानेश्वरने एप्रिल महिन्यात पुन्हा दुसऱ्या मुलीशी लग्न केले. तिला दागिने देण्यासाठी विशाल सुभाष कुलथे (२५, रा. शिरुर कासार) या सराफाचा १५ दिवसापूर्वी खून केला. या धक्क्याने सराफाचे वृद्ध आजोबा सुधाकर जगन्नाथ कुलथे (७०) मृत्यू पावले. विशालच्या चौकशीचा ससेमिरा लागल्याने आरोपीचे मामा अजिनाथ गायके यांनीही आत्महत्या केली. आरोपी ज्ञानेश्वर याने दोन खून केले असून दोन मृत्यूस तो कारणीभूत ठरला आहे.

Web Title: man killed girlfriend then does second marriage kills jeweller ‍