Video : पवईतील बांगुर्डा तलावात बुडून एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 16:48 IST2019-07-11T16:31:23+5:302019-07-11T16:48:03+5:30
आज दुपारी १ वाजताच्या सुमारास चैतन्य ढेरंगे याचा मृतदेह आढळून आला.

Video : पवईतील बांगुर्डा तलावात बुडून एकाचा मृत्यू
मुंबई - पवईमधील विहार लेक परिसरातील फ़िल्टर पाडानजीक असलेल्या बांगुर्डा गावातील बांगुर्डा तलावात एक पुरुष बुडाल्याची घटना काल सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्कालीन विभागाकडून शोध मोहीम सुरु केली.परंतु खूप उशिरापर्यंत शोधा शोध करूनही मुलाचा शोध लागत नव्हता. या मृतकाचे नाव चैतन्य रंगनाथ ढेरंगे (३१) आहे. घाटकोपर पश्चिमेकडील गंगावाडी येथे राहत होता. तो आपल्या पाच मित्रांसोबत पोहायला पवईतील तलावात गेला होता. आज दुपारी १ वाजताच्या सुमारास चैतन्य ढेरंगे याचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पवईतील बांगुर्डा तलावात बुडून पुरुषाचा मृत्यूhttps://t.co/fUWIufX59Y
— Lokmat (@MiLOKMAT) July 11, 2019