शहरं
Join us  
Trending Stories
1
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
2
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
3
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
4
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
5
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
6
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
7
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
8
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
9
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
10
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
11
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
12
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
13
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
14
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
15
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
16
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
17
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
18
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
19
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
20
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमसंबंध घरच्यांना सांगण्याची धमकी देत मॅनेजर तरुणीला ६ लाखांना लुबाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 14:59 IST

ही तरुणी एका नामांकित बँकेत मॅनेजर म्हणून काम करते..

ठळक मुद्दे आरोपीला अटक 

पुणे : त्या तरुणाचे लग्न झाल्याचे समजल्यानंतर तरुणीला प्रेमसंबंधाविषयी घरच्यांना सांगण्याची धमकी देऊन तब्बल ६ लाख रुपये लुबाडणाऱ्या तरुणाला खडकी पोलिसांनीअटक केली आहे़. चेतन अशोक खोसे (वय २८) असे त्याचे नाव आहे़. खडकी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे़. याप्रकरणी एका २८ वर्षाच्या तरुणीने खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. हा प्रकार मे २०१० ते ५ मे २०१९ दरम्यान घडला़. याबाबत पोलिसांनी सांगितले की, ही तरुणी एका नामांकित बँकेत मॅनेजर म्हणून काम करते. त्यांच्याच बँकेत असलेल्या चेतन खोसे याच्याशी त्यांचे प्रेमसंबंध निर्माण झाले़.  ते एकत्र फिरु लागले़. दरम्यान, तो दुसऱ्या बँकेत नोकरीला लागला़ काही दिवसांनी या तरुणीला चेतनचे लग्न झाले असल्याची माहिती मिळाली़ तेव्हा ती चेतनला टाळू लागली़. त्यानंतर चेतनने तिला धमकी देण्यास सुरुवात केली़. तुला मला भेटावेच लागेल, असे म्हणत धमकावू लागला़. या तरुणीने त्याची भेट घेतल्यावर आपले प्रेमसंबंध असल्याची माहिती तुझ्या आईवडिलांना सांगतो असे म्हणून तिच्याकडे पैशांची मागणी करुन लागला़. सुरुवातीला तिने घराच्यापासून हे लपविण्यासाठी तो मागेल तिकडे त्याला पैसे देऊ लागली़. त्यानंतर त्याची मजल वाढत गेली़. त्याने तिला बँकेतून कर्ज काढून ४ लाख रुपये दे, असे सांगितले़. त्याप्रमाणे तिने कर्ज काढून त्याच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले़. तरीही त्याची पैशाची हाव काही सुटत नव्हती़, अशाप्रकारे तिने वेळोवेळी ६ लाख १८ हजार रुपये दिले़. त्यानंतरही त्याचे धमक्या देणे सुरु असल्याने शेवटी या त्रासाला कंटाळून तिनेच आपल्या आईवडिलांना हा सर्व प्रकार सांगितला़. त्यानंतर त्यांनी खडकी पोलिसांकडे फिर्याद दिली असून पोलिसांनी चेतन खोसे याला अटक केली आहे़.   ..............       

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfraudधोकेबाजीWomenमहिलाArrestअटक