'तुझ्या अंजुचे दुसरे लग्न लावू'; मेहुणीच्या फोननंतर जिजूने आयुष्य संपविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2023 17:02 IST2023-09-29T17:02:08+5:302023-09-29T17:02:25+5:30

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जोगेंद्रच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली आहे, यानुसार पोलिसांनी अंजू आणि तिच्या घरच्यांवर गुन्हा दाखल केला आहे. 

man ended her life after her sister-in-law's call, gaziabad man record video on the name of wife anju | 'तुझ्या अंजुचे दुसरे लग्न लावू'; मेहुणीच्या फोननंतर जिजूने आयुष्य संपविले

'तुझ्या अंजुचे दुसरे लग्न लावू'; मेहुणीच्या फोननंतर जिजूने आयुष्य संपविले

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये पत्नी आणि सासरच्यांच्या जाचाला कंटाळून पतीने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी पतीने बेडरुममध्ये बेडवर व्हिडीओ रेकॉर्ड करत पत्नीसाठी मेसेज पाठविला होता. यानंतर त्याने फास लावून घेत जीवन संपविले आहे.

या व्हिडीओमध्ये पतीने पत्नी आणि सासरच्यांवर त्रास दिल्याचा आरोप केला आहे. यावरून पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. हा व्हिडीओ दीड मिनिटांचा आहे. गोविंपुरममधील एका गावात जोगेंद्र याचे चार वर्षांपूर्वी बुलंदशहरातील अंजूसोबत लग्न झाले होते. काही दिवसांपूर्वी पत्नी पतीला न सांगता मुलांना घेऊन माहेरी निघून गेली होती. 

यानंतर काही काळाने मेहुणीने जोगेंद्रला फोन करून अंजूचे दुसरे लग्न लावू असे सांगितले होते. यावरून जोगेंद्र व्यतिथ झाला होता व त्याने २३ सप्टेंबरला घरातच फास लावून घेतला. गळफास घेण्यापूर्वी जोगेंद्रने पत्नी अंजूच्या नावाने एक व्हिडिओ मेसेज रेकॉर्ड केला होता. 

''अंजू, हा मेसेज तुझ्यासाठी आहे. तुझ्यावर प्रेम आहे. बाकी, आज शेवटचा चेहरा बघ. तुझी मुले बरी आहेत ना, त्यांना आनंदी ठेव. बघ सोनू, चल आता मी जातो. तुझी बहीण म्हणाली होती की ती तुझं पुन्हा लग्न लावून देणार, आता कर. चला, टाटा, स्वतःची काळजी घ्या. माझ्याकडून जी काही चूक झाली असेल ती क्षमा करा.'', असे जोगेंद्रने व्हिडीओमध्ये म्हटले आहे. 

व्हिडीओमध्ये जोगेंद्रने फाशीची रस्सीदेखील दाखविली आहे. व्हिडीओ बनविल्यानंतर जोगेंद्रने जीव दिला. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जोगेंद्रच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली आहे, यानुसार पोलिसांनी अंजू आणि तिच्या घरच्यांवर गुन्हा दाखल केला आहे. 

Web Title: man ended her life after her sister-in-law's call, gaziabad man record video on the name of wife anju