हृदयद्रावक! नात्याला काळीमा; खुनातील आरोपी मामाकडून भाचीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 21:59 IST2020-02-01T21:57:24+5:302020-02-01T21:59:26+5:30
आरोपी काही दिवसांपूर्वी एका खून प्रकरणात जामिनावर बाहेर आला होता.

हृदयद्रावक! नात्याला काळीमा; खुनातील आरोपी मामाकडून भाचीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या
दाहोद - एकीकडे निर्भयाच्या दोषींना राजधानी दिल्लीत फाशी देण्याची मागणी वाढत आहे असताना दुसरीकडे हृदयद्रावक बलात्काराच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. अशीच एक हृदयद्रावक घटना गुजरातमधील दाहोद जिल्ह्यात घडली आहे. जिथे एका व्यक्तीने आपल्या सहा वर्षांच्या भाचवर बलात्कार करून हत्या केली आहे. आरोपी नात्याने मामा असलेल्या नराधमास अटक करण्यात आली आहे. शैलेश मावी असं आरोपीचे नाव असून तो काही दिवसांपूर्वी एका खून प्रकरणात जामिनावर बाहेर आला होता.
इन्स्टाग्रामवर तरुणीशी मैत्री अन् हॉटेलमध्ये नेऊन केला बलात्कार
लग्नाचे आमिष दाखवून मित्रानेच केला अत्याचार
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी ही मुलगी शाळेतून परत येत असताना मावी तिला मोटारसायकलवरून घेऊन गेला. त्याने मुलीला निर्जन ठिकाणी घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने मुलाची हत्या केली आणि मृतदेह तलावाजवळ फेकून दिला. मुलगी घरी परतली नाही तेव्हा तिच्या आजीने पोलिसांत तक्रार दाखल केली. मुलीचे पालक इतरत्र मजुरीचे काम करतात.
गरबाडा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याला मुलीच्या आजीने माहिती दिली की, तिने मावीच्या मोटरसायकलवर तिच्या नातीला शेवटचे पाहिले होते. यानंतर पोलिसांनी मावीचा शोध सुरू केला आणि अखेर काल रात्री त्याला अटक करण्यात आली. अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपी मावी हा पीडित मुलीच्या आईचा भाऊ आहे. त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. आठ महिन्यांपूर्वी तो एका हत्या प्रकरणात जामिनावर बाहेर आला होता.