पतीनं आधीच केली होती १३ लग्न; १४ व्या पत्नीला समजलं अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 09:29 IST2022-02-15T09:27:20+5:302022-02-15T09:29:44+5:30

पोलिसांकडून आरोपीला अटक; मेट्रोमॉनियल साईट्सच्या माध्यमातून अनेक महिलांना गंडा

Man arrested in Odisha for marrying and duping 14 women | पतीनं आधीच केली होती १३ लग्न; १४ व्या पत्नीला समजलं अन् मग...

पतीनं आधीच केली होती १३ लग्न; १४ व्या पत्नीला समजलं अन् मग...

ओदिशातील एका व्यक्तीनं लग्नांचा विक्रम केला आहे. त्यानं एक, दोन नव्हे, तर १४ लग्नं केली आहेत. सात राज्यांमध्ये त्यानं १४ विवाह केले. यासाठी त्यानं मेट्रोमॉनियल साईट्सची मदत घेतली. या महिलांकडून त्यानं पैसेदेखील घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे आता पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्याच्या १४ व्या पत्नीसोबत ओदिशाची राजधानी भुवनेश्वरमध्ये वास्तव्यास होता. त्याची पत्नी दिल्लीतल्या एका शाळेत शिक्षिका आहे. पतीनं आधीच १३ विवाह केल्याची माहिती मिळताच शिक्षक पत्नीनं पोलिसात तक्रार दाखल केली.

भुवनेश्वरचे पोलीस उपायुक्त उमाशंकर दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, १८६२ मध्ये आरोपीनं पहिला विवाह केला. २००२ मध्ये त्यानं दुसरं लग्न केलं. या दोन लग्नातून त्याला ५ मुलं झाली. २००२ ते २०२० च्या दरम्यान मेट्रोमॉनियल साईटच्या माध्यमातून अन्य महिलांशी मैत्री केली आणि त्यांच्याशी विवाह केले. आरोपी केंद्रपाडा जिल्ह्याचा रहिवासी आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी ३० ते ४० वर्षे वयोगटातील महिलांना लक्ष्य करायचा. यातील बऱ्याचशा महिला घटस्फोटित होत्या. आरोपीनं मात्र त्याच्यावर झालेले सर्व आरोप फेटाळून लावले होते.

Web Title: Man arrested in Odisha for marrying and duping 14 women