Malad Hit and Run Case:मुंबईच्या मालाड परिसरातून 'हिट अँड रन'ची एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका वेगवान इनोव्हा कारने आई-वडिलांच्या एकुलत्या एका मुलाला चिरडलं, ज्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी चालक घटनास्थळावरून पसार झाला. धक्कादायक बाब म्हणजे ज्या चिमुकल्याचा या अपघातातमृत्यू झाला, त्याचा जन्म लग्नाच्या २० वर्षांनंतर झाला होता.
या घटनेचा एक सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये दिसतं की, ४ वर्षांच्या मुलाला चिरडल्यानंतर कार अचानक थांबते. त्यानंतर कार चालक वॉचमनला याची माहिती देतो. थोड्या वेळाने वॉचमन त्या मुलाला कडेवर घेऊन जाताना दिसतो. ही संधी साधून आरोपी चालक तिथून पळून जातो.
मिळालेल्या माहितीनुसार, मालाड पूर्वेकडील 'निलयोग विराट' बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या सिंह परिवारात ५ तारखेला लग्न होतं. संपूर्ण कुटुंब लग्नाच्या आनंदात मग्न असतानाच ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास लक्ष हा मुलगा बिल्डिंगच्या खाली खेळत होता. त्याच वेळी एका काळ्या रंगाच्या इनोव्हा क्रिस्टा कारने भरधाव वेगात येऊन ४ वर्षीय लक्षला चिरडलं.
मुलाचे वडील जयप्रकाश सिंह यांनी रडत सांगितलं की, लग्नाच्या २० वर्षांनंतर त्यांना मुलगा झाला होता. तो घराचा एकमेव वारस होता. जर चालकाने मुलाला वेळेत रुग्णालयात नेलं असतं तर कदाचित त्याचा जीव वाचला असता. तसेच त्यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. आरोपीला जामीन मिळणार असल्याचं कळताच कुटुंबीयांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेऊन गोंधळ घातला, त्यानंतर आरोपीचा जामीन रोखला गेला.
या प्रकरणी 'हिट अँड रन' अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आरोपीने मुलाला गाडीने फरफटत नेल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. दिंडोशी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला असून रमेश देवजी जतरारा नावाच्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपी फक्त या सोसायटीच्या पार्किंगमध्ये गाडी उभी करत असे, तो तिथे राहत नव्हता. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Web Summary : A four-year-old boy in Mumbai, born after 20 years of marriage, died in a hit-and-run accident. A speeding Innova fatally struck him. The driver fled, but was later arrested after family protests. Police are investigating.
Web Summary : मुंबई में 20 साल बाद हुए एक चार वर्षीय बच्चे की हिट-एंड-रन में मौत हो गई। तेज रफ्तार इनोवा ने उसे कुचल दिया। चालक भाग गया, लेकिन बाद में परिवार के विरोध के बाद उसे गिरफ्तार कर लिया गया। पुलिस जांच कर रही है।