शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांची मोठी कारवाई; भाजपा नेता राकेश सिंहला ड्रग्सप्रकरणी अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 19:23 IST

Drugs Case : पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. पामेला गोस्वामीने अटकेनंतर राकेश सिंहवर आरोप केले होते.

ठळक मुद्देराकेश सिंह भाजपाचे बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय मानले जातात. ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून राकेश सिंहचं नाव समोर आलं होतं.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकाचे बिगुल वाजलं असताना भाजपाच्या नेत्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. ड्रग्ज प्रकरणात भाजपा महिला नेत्या पामेला गोस्वामीला ड्रग्स प्रकरणी काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. नंतर आता या प्रकरणात आणखी एका भाजपा नेता राकेश सिंहला अटक करण्यात आली आहे. 

पश्चिम बंगालमधील पूर्व वर्धमान जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली आहे. पामेला गोस्वामीने अटकेनंतर राकेश सिंहवर आरोप केले होते. पोलिसांनी राकेश सिंहच्या दोन्ही मुलांना देखील बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

राकेश सिंह भाजपाचे बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांचे निकटवर्तीय मानले जातात. ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार म्हणून राकेश सिंहचं नाव समोर आलं होतं. या प्रकरणात पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती. या नोटिशीला राकेशने कोलकाता हायकोर्टात आव्हान दिलं होतं. हायकोर्टाने ही याचिका फेटाळताच त्याला अटक करण्यात आली आहे. यावेळी पोलीस आणि राकेश सिंह यांच्या मुलांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांच्या कारवाईत अडथळा आणल्याबद्दल त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भाजपा युवा मोर्चाच्या पर्यवेक्षक आणि हुगळी जिल्ह्याच्या सरचिटणीस पामेला गोस्वामीला १९ तारखेला अटक करण्यात आली होती. त्यांच्या गाडीमध्ये लाखो रुपयांचा अवैध कोकेन सापडला होते. या अटकेनंतर दुसऱ्याच दिवशी पामेलाने राकेश सिंहवर आरोप केले होते. वरिष्ठ भाजपा नेत्याच्या जवळच्या असलेल्या राकेश सिंहने मला या प्रकरण्यात अडकवण्याचं षडयंत्र केलं आहे. माझ्याकडे सर्व पुरावे असून या प्रकरणाची CID चौकशी करण्यात यावी,’ अशी मागणी पामेलाने केली होती.

 

भाजपाच्या युवा नेत्याला पोलिसांनी केली अटक; कारमधून घेऊन जात होती कोकेन 

 

 

टॅग्स :Drugsअमली पदार्थArrestअटकHigh Courtउच्च न्यायालयwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपा