शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

अमेरिकेच्या हवाई तळावर मोठा हल्ला; ७ विमाने उडवली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 7:11 PM

या हल्ल्याप्रकरणी  ५ संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसोमालियातून कार्यरत अल-शबाब या दहशतवादी संघटनेचा संबंध अल - कायदयाशी आहे. या हल्ल्यात ७ विमाने आणि ३ वाहने उध्वस्त करण्यात आली आहेत. मात्र, या हल्ल्यात अद्याप जीवितहानी झालेली नाही.

नैरोबी - रविवारी सकाळी सोमालियाच्या इस्लामिक दहशतवादी संघटनेने अल-शबाबने केनियाच्या लामा काउंटी येथे अमेरिकन एअरबेसवर हल्ला केला. या हल्ल्यात ७ विमाने आणि ३ वाहने उध्वस्त करण्यात आली आहेत. मात्र, या हल्ल्यात अद्याप जीवितहानी झालेली नाही. लामू काउंटीचे आयुक्त इरुंगा मचारिया यांच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्याप्रकरणी  ५ संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

केनियाच्या लामू काउंटीच्या 'मंदा बे' मध्ये अमेरिका आणि केनियाच्या संयुक्त लष्करी विमानतळ आहेत. पेंटागॉनच्या म्हणण्यानुसार, सुमारे १०० अमेरिकन सैनिक लष्करी छावणीत आहेत. अल शबाबच्या प्रवक्त्याने  अल जझिराला या मीडिया समूहाला सांगितले की, हल्ल्याचा मध्य-पूर्वेतील (अमेरिका - इराण)  सुरू असलेल्या वादाशी काही संबंध नाही.

सोमालियामध्ये ट्रक बॉम्बने ७९ जणांचा बळी घेतलासोमालियातून कार्यरत अल-शबाब या दहशतवादी संघटनेचा संबंध अल - कायदयाशी आहे. यापूर्वी त्याने केनियावर अनेक वेळा हल्ला केला आहे. एका आठवड्यापूर्वी त्याने सोमालियाची राजधानी असलेल्या मोगादिशु येथे ट्रक बॉम्बद्वारे हल्ला केला होता, त्यात ७९ जण मृत्युमुखी पडले.  त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने हवाई हल्ल्यात ७ दहशतवाद्यांचा खात्मा केला.

सप्टेंबरमध्येही अमेरिकेच्या तळावर हल्ला केलासप्टेंबर २०१९ मध्ये अल-शबाबने सोमालियातील अमेरिकन सैन्याच्या तळावर हल्ला केला. हा हल्ला मोगादिशुच्या वायव्येस 110 कि.मी. अंतरावर असलेल्या बालेदोगले येथे अमेरिकेच्या ठिकाणावर करण्यात आला. तेथे बंदूकधार्‍यांनी गोळीबारही केला होता. त्यानंतर युरोपियन युनियनच्या (ईयू)  सल्लागारांच्या ताफ्यावरही हल्ला करण्यात आला. मात्र, दोन्ही हल्ल्यांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

टॅग्स :terroristदहशतवादीkenyaकेनियाAmericaअमेरिकाairplaneविमानArrestअटक