सिडकोच्या गृहनिर्माण साईटवर मोठा अपघात; लिफ्ट कोसळून चार कामगारांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2022 00:03 IST2022-06-29T00:02:47+5:302022-06-29T00:03:04+5:30
Navi Mumbai Cidco Lift collapse: बांधकाम मटेरियल नेणारी लिफ्ट कोसळल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला.

सिडकोच्या गृहनिर्माण साईटवर मोठा अपघात; लिफ्ट कोसळून चार कामगारांचा मृत्यू
तळोजा फेज २ सिडको गृहनिर्माण योजना कंस्ट्रक्शन साईटवरील अपघातामध्ये शिर्के कंस्ट्रक्शन कंपनीचे ४ मजूर मृत झाले तर २ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. सदर घटना अत्यंत दुख:द असून संपूर्ण घटनेची सिडकोतर्फे चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
बांधकाम मटेरियल नेणारी लिफ्ट कोसळल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला. लिफ्ट जवळ उभे असलेले दोन कामगार, तर लिफ्ट खाली गाडीत बसलेले दोन कामगार ठार झाले. तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना संध्याकाळी 5 वाजता घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ७ लाख तर गंभीर जखमींच्या कुटुंबियांना २ लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचे निर्देश कंत्राटदार बी. जी. शिर्के यांना सिडकोतर्फे देण्यात आले आहेत. याचबरोबर जखमींवरील उपचारांचा खर्चदेखील शिर्के यांच्यातर्फे करण्यात येणार आहे.
जखमी, मृतांची नावे खालील प्रमाणे
1)जखमी -सकिरे आलम वय 25 वर्ष
2) जखमी -मोहम्मद सज्जत अली वय 22 वर्ष
3)मयत- प्रकाश परसराम पावडे वय 48 वर्ष
4) मारुती केरबा आनेवाड वय 40 वर्ष
5) गंगाराम राजेंद्र रविदास 22 वर्ष
6) पंकज भीमराय वय 25 वर्ष