गोळीबार प्रकरणी मुख्य आरोपीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2019 21:53 IST2019-01-18T21:51:02+5:302019-01-18T21:53:04+5:30
याप्रकरणी मुख्य आरोपी जावेद शेख आणि त्याच्या साथीदाराला परिमंडळ आठच्या पथकाने गुरुवारी रात्री अटक केली.

गोळीबार प्रकरणी मुख्य आरोपीला अटक
मुंबई - सहारगावमध्ये बुधवारी मुख्तार शेख उर्फ पप्पू यांच्यावर गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी मुख्य आरोपी जावेद शेख आणि त्याच्या साथीदाराला परिमंडळ आठच्या पथकाने गुरुवारी रात्री अटक केली.
जावेद शेख याच्यासह त्याच्या साथीदाराला अमरावतीमधून अटक करण्यात आल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. मुक्तार यांच्याकडून त्यांनी खंडणीची मागणी केली होती. मात्र ती देण्यास नकार दिल्याने त्यांनी हा हल्ला केल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. याप्रकरणी विकास शर्मा याला अटक करण्यात आले असून त्याला याप्रकरणी साक्षीदार बनविले जाणार आहे. परिमंडळ आठचे पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे यांनी तपासासाठी काही विशेष पथकांची नियुक्ती केली होती. जावेद आणि त्याचा साथीदार हल्ला केल्यानंतर गुजरातला पसार झाल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पथक गुजरातला रवाना झाले. मात्र त्यानंतर दोघे हल्लेखोर अमरावतीला पळून गेले. तेव्हा पोलिसांनी पाठलाग करत त्यांना अटक केली.