maid showed a knife and plundered seven and a half lakhs | मोलकरणीने चाकूचा धाक दाखवुन साडे सात लाखांचा ऐवज लुटला  
मोलकरणीने चाकूचा धाक दाखवुन साडे सात लाखांचा ऐवज लुटला  

मीरारोड - एका संकेत स्थळावरुन घरकामासाठी आणलेल्या महिलेने घरात एकटट्या असलेल्या ११ वर्षाच्या मुलीस चाकूचा धाक दाखवत मारहाण केली व घरातील साडे सात लाख रुपयांचे दागीने, मोबाईल असा ऐवज घेऊन पोबारा केल्याची घटना मीरारोडच्या गोकुळ व्हिलेज भागात घडली आहे.

ग्रीन पार्क मध्ये पती, मुलगी हिबा (११) सह राहणाराया सबीना करीम यांचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. त्यासाठी जवळच एक दुकान त्यांनी भाड्याने घेतलेले आहे. पती नोकरीला असुन पार्लरच्या व्यवसायासाठी वेळ मिळावा म्हणुन वर्क इंडिया या संकेत स्थळावरुन जुन २०१९ मध्ये त्यांनी तस्लीम सय्यद रा. कांदिवली या महिलेस सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत १० हजार महिने पगारावर घरकामासाठी ठेवले होते. परंतु तीचे काम न आवडल्याने जुलै महिन्यातच तीला कामा वरुन कमी केले होते.

त्या दरम्यान सबीना यांना तस्लीम सह संकेतस्थळ कंपनीने तीची सविस्तर माहिती दिली नव्हती. कामा वरुन कमी करताना तस्लीमने आपली मुलगी आंधळी असुन किडनीचा विकार असल्याचे सांगुन तुम्हास पार्लरसाठी गिऱ्हाईक आणुन देईन त्याचे कमीशन मला द्या असे सांगीतले होते. त्या नुसार तीने एकदा मुस्कान नावाची महिला गि-हाईक पाठवली होती. सबीनाने तिचे झालेले ५ हजार बिल तस्लीमला मुलीच्या उपचारा करता दिले होते.

१२ डिसेंबर रोजी मुस्कान पार्लरसाठी तस्लीम सह आली. त्यावेळी तस्लीम कारण सांगुन थेट सबीनाच्या घरी गेली. घरात असलेल्या हिबा ला तीने चाकूचा धाक दाखवत मारहाण केली. नंतर घरातील कपाटातुन सोन्याचे दागीने तसेच मोबाईल असा साडे सात लाखांचा ऐवज लुटुन तीने पळ काढला. या प्रकरणी मीरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: maid showed a knife and plundered seven and a half lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.