जळगाव : शायर मुनव्वर राणा यांनी एका न्यूज चॅनेलमधील चर्चेदरम्यान महर्षी वाल्मिकी यांची तुलना थेट तालिबान्यांसोबत केल्याच्या विधानाविरोधात जळगाव शहरातील शनिपेठ पोलीस ठाण्यात राणा यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोळी समाजबांधवांसह भाजपचे स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुनव्वर राणा यांच्या आक्षेपार्ह विधानाचा कोळी समाजबांधवांकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे.शायर मुनव्वर राणा यांनी एका न्यूज चॅनलमधील चर्चेदरम्यान महर्षी वाल्मिकी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. याबाबत चौकशी केल्यानंतर मुनव्वर राणा यांनी रामायणकार व कोळी समाजबांधवांचे दैवत महर्षी वाल्मीक यांची तुलना तालिबान्यांशी करत, त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान करीत धार्मिक भावना दुखावल्याचे कैलास सोनवणे यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला आहे. यावेळी भाजप नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासोबत किशोर बाविस्कर, मुकुंदा सोनवणे, नंदकुमार सपकाळे यांच्यासह कोळी समाजबांधव उपस्थित होते. याप्रकरणी राणा यांना अटक करण्याचीही मागणी कोळी समाजबांधवांकडून करण्यात आली आहे.
महर्षी वाल्मिकींची तालिबान्यांशी केली तुलना; शायर मुनव्वर राणाविरोधात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 17:01 IST
Filed a case against Shayar Munawwar Rana : मुनव्वर राणा यांच्या आक्षेपार्ह विधानाचा कोळी समाजबांधवांकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे.
महर्षी वाल्मिकींची तालिबान्यांशी केली तुलना; शायर मुनव्वर राणाविरोधात गुन्हा दाखल
ठळक मुद्दे शायर मुनव्वर राणा यांनी एका न्यूज चॅनलमधील चर्चेदरम्यान महर्षी वाल्मिकी यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. याबाबत पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल करून घेतला आहे. यावेळी भाजप नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासोबत किशोर बाविस्कर, मुकुंदा सोनवणे, नंदकुमार सपकाळे यांच्यासह कोळी समाजबांधव उपस्थित होते.