शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

भोपाळच्या सेप्टिक टँकमध्ये महाराष्ट्रातील तरुणीचा मृतदेह; 'लिव्ह-इन' पार्टनरचा भयानक अंत! टॅटूमुळे ओळख पटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 16:12 IST

मध्य प्रदेशात गोंदियातील महिलेची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

MP Crime: इंस्टाग्रामवरून सुरू झालेली एक प्रेमकहाणी अत्यंत भीषण वळणावर संपली आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला हादरवून सोडणाऱ्या या घटनेत गोंदियातील ३३ वर्षीय तरुणीची तिच्या प्रियकराने गळा आवळून हत्या केली आणि तिचा मृतदेह लोहेच्या पेटीत बंद करून सेप्टिक टँकमध्ये फेकून दिला. अशरफी उर्फ सिया असे मृत तरुणीचे नाव असून, भोपाळ पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या गुन्ह्याचा छडा लावला आहे.

मैत्री, प्रेम आणि फसवणूक

मूळची गोंदिया येथील रहिवासी असलेल्या सियाची सुमारे एक वर्षापूर्वी भोपाळच्या समीर नावाच्या व्यक्तीशी इंस्टाग्रामवर ओळख झाली होती. संवादाचे रूपांतर प्रेमात झाले आणि समीरसोबत संसार थाटण्याच्या स्वप्नापोटी सिया तीन महिन्यांपूर्वी आपले घर सोडून भोपाळला आली. मात्र, भोपाळला पोहोचल्यावर तिला समजले की समीर विवाहित असून त्याला दोन मुले आहेत.

घरातील वाद आणि हत्येचा कट

समीरच्या कमला नगरमधील घरात सिया राहू लागल्याने तिथे दररोज भांडणे होऊ लागली. समीरची पत्नी आणि सिया यांच्यात वारंवार वाद होत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. सिया समीरवर लग्नासाठी दबाव टाकत होती किंवा लग्नास नकार दिल्यास ५ लाख रुपये आणि कायदेशीर कारवाईची मागणी करत होती. याच तणावातून समीरची पत्नी माहेरी निघून गेली. सोमवारी सायंकाळी पुन्हा एकदा मोठे भांडण झाले आणि संतापलेल्या समीरने सियाचा गळा आवळून तिचा जीव घेतला.

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कुटुंबाने दिली साथ

हत्या केल्यानंतर समीरने चक्क आई, भाऊ आणि बहिणीची मदत घेतली. त्यांनी सियाचा मृतदेह एका लोखंडी पेटीत भरला आणि मध्यरात्रीच्या सुमारास जवळच असलेल्या एका रिकाम्या प्लॉटमधील सेप्टिक टँकमध्ये ती पेटी फेकून दिली. गुरुवारी सायंकाळी त्या प्लॉटजवळ मुले खेळत असताना त्यांना प्रचंड दुर्गंधी आली. नागरिकांनी पाहिले असता टँकमध्ये एक लोखंडी पेटी तरंगताना दिसली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पेटी बाहेर काढली असता, त्यामध्ये सियाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला.

ओळख पटवण्यासाठी 'टॅटू'चा आधार

मृतदेह पूर्णपणे कुजलेला असल्याने ओळख पटवणे कठीण होते. मात्र, सियाच्या हातावर दीपक नावाचा टॅटू आणि त्यावर २६ मे १९९२ ही जन्मतारीख कोरलेली होती. या एका पुराव्यामुळे पोलिसांनी तिची ओळख पटवली. तपासात असेही समोर आले आहे की, सियाचे यापूर्वी महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये तीन वेळा विवाह झाले होते.

पोलिसांची कारवाई

मुख्य आरोपी समीर सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास मदत केल्याप्रकर्णी पोलिसांनी समीरचा भाऊ, आई आणि बहिणीला अटक केली आहे. समीरची पत्नी देखील संशयाच्या भोवऱ्यात असून तिची चौकशी सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra woman murdered by lover in Bhopal, body in septic tank.

Web Summary : A Maharashtra woman was murdered by her live-in partner in Bhopal after she discovered he was married. He dumped her body in a septic tank with family help. The victim was identified by a tattoo.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्रMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस