शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 17:57 IST

Crime news Maharashtra: एका १७ वर्षाच्या मुलीवर अत्याचार केले. त्याचे व्हिडीओ शूट केले, फोटो काढले. हे व्हिडीओ आणि फोटो नंतर आरोपीने सोशल मीडियावर पोस्ट केले. 

Akola Crime News: एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. आरोपीने अत्याचार करतानाचे व्हिडीओ आणि फोटोही काढले होते. ते अश्लील व्हिडीओ व फोटो व्हायरल केले. अकोल्यात ही घटना घडली असून, खदान पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे या गुन्ह्यात दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांचा समावेश आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

आरोपींकडून अल्पवयीन पीडित मुलीला जबर मारहाण करण्यात आली. त्यानंतर तिच्यावर अत्याचार करण्यात आले. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पीडितेचे अश्लील फोटोही व्हायरल करण्यात आले आहेत. 

प्रकरण कसे आले उघडकीस?

एका सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने पीडितेच्या नातेवाइकाकडून शहरातील खदान पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आहे. या प्रकरणी आरोपी सलमान खान अयाज खान (२४), अब्दुल साहिल अब्दुल वाजीद (२०) व अन्य दोन विधिसंघर्षग्रस्त बालकांविरोधात विनयभंग, लैंगिक अत्याचार, पोक्सो व अट्रॉसिटी अॅक्टनुसार खदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

वाचा >>एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत

यातील आरोपी सलमान खान अयाज खान व अब्दुल साहिल अब्दुल वाजीद या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी करीत आहेत.

सोशल मीडियावर फोटो व्हायरल !

आरोपींनी पीडित मुलीचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढून इन्स्टाग्रामवर व्हायरल केले आहेत. दरम्यान, या प्रकरणात आरोपी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्या दिशेने उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी तपास सुरू केला आहे.

तपास एसडीपीओंकडे

मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अश्लील व्हिडीओ व फोटो व्हायरल केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये लैंगिक अत्याचार, विनयभंग, पोक्सो व अॅट्रासिटी अॅक्टचा समावेश असल्याने या गुन्ह्यांचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सतीश कुलकर्णी करीत आहेत.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसPOCSO Actपॉक्सो कायदा