शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; २९ नवे चेहरे रिंगणात, पहिल्या यादीत कोणाची नावे?
2
PNB Fraud: पंजाब नॅशनल बँकेत पुन्हा झाला ₹२,४३४ कोटींचा घोटाळा; RBI ला दिली माहिती, कोणावर आहे आरोप?
3
महाराष्ट्रभर पारा आणखी घसरणार! नवीन वर्षाचे स्वागत थंडीच्या कडाक्यानेच, तयार रहा...
4
बांगलादेशमध्ये प्रसिद्ध गायक जेम्सच्या संगीत कार्यक्रमावर जमावाने केला हल्ला, अनेक जण जखमी
5
अमेरिका नाही, या मुस्लिम देशाने २०२५ मध्ये सर्वाधिक भारतीयांना बाहेर काढले; रशियाचाही समावेश
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २७ डिसेंबर २०२५: अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल, प्राप्तीत वाढ होईल
7
संपादकीय: कुऱ्हाड - झाडांवर, निष्ठेवरही! महाजनांची मुजोरी आता कार्यकर्त्यांवरही...
8
मुंबई निवडणुकीत डॅडी...! अरुण गवळीच्या कन्या रिंगणात; भावजईचा शिंदेसेनेत प्रवेश
9
महापालिका रणधुमाळी : सत्तेत सोबत असलेले अजित पवार निवडणुकीत राज्यभर विरोधात
10
कबुतरांना खाद्य दिल्याने दंड; दादरचा व्यावसायिक दाेषी; दंडाचे पहिलेच प्रकरण 
11
नवनिर्वाचित शिंदेसेना नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या; घराजवळच पाच जणांकडून धारदार शस्त्रांनी वार 
12
उद्धव-राज एकत्र आल्याने ६७ प्रभागांत फरक पडणार; २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पडलेल्या मतांवरून चित्र स्पष्ट
13
युतीच्या चर्चा फिसकटल्या? आता बंडखोरी टाळण्यासाठी विलंब
14
तुम्ही लावता त्या अगरबत्तीतून आता येणार नाही ‘विषारी’ धूर! केंद्र सरकारने कठोर पाऊल, घातक रसायनांवर बंदी  
15
खातेदाराची गोपनीय केवायसी वापरून बँक कर्मचाऱ्याने दोन कोटींना फसवले; सात बँकांना २.५ कोटी रुपयांचा दंड
16
अतुलनीय धाडस अन् जिद्द; २० बाल‘भारत’वीरांचा सन्मान
17
नोकरी सोडताय? थांबा, आलिशान फ्लॅट घ्या! कंपन्यांना चांगले कर्मचारीच मिळत नाहीत...
18
३६ कोटींहून अधिक किमतीचे हेरॉइन जप्त; तीन महिलांसह ९ आरोपींना घेतले ताब्यात
19
सीईटी परीक्षांच्या नोंदणीला आठवडाभरात सुरुवात होणार
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Crime News: महाराष्ट्र: आत्याची शेजारीन... ३२ वर्षांच्या महिलेने नववीच्या मुलाला शरीर संबंधांची लत लावली; आईने मोबाईल तपासताच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2023 19:15 IST

मुलगा वयात येत होता, आत्याच्या शेजारनीने डाव साधला. मुलगा तिच्या पाशात पुरता गुंतला...

महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या दररोजच्या झालेल्या असताना आता एका महिलेनेच अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईजवळील कल्याणमध्ये घडला आहे. एका ३२ वर्षांच्या महिलेने नववीत शिकणाऱ्या मुलाला आपल्या गोडगोड बोलण्यात गुंतवून आधी दारु पाजली अन नंतर त्याच्याशी सातत्याने शरीर संबंध ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. 

हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही, तर दोघांतील सेक्सचे रेकॉर्डिंगही अनेकदा करण्यात आले होते. हे सारे त्या मुलाच्या मोबाईलमध्ये होते. हा मुलगा घरी नेहमी दारु पिऊन येऊ लागला होता. तसेच मोबाईलवर सतत बोलत असायचा. यामुळे त्याच्या आईने वैतागून त्याचा मोबाईल काढून घेतला तेव्हा हा प्रकार समोर आला आहे. 

अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाने या महिलेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून ती नाशिकची राहणारी आहे. मुलाच्या आत्यासोबत ती महिला कल्याणला येत असायची. यामुळे त्या मुलाची आणि तिची ओळख होती. मुलगा वयात आला होता, त्याचा फायदा या महिलेने घेतला. 

कल्याण पूर्वमध्ये या मुलाचे घर आहे. त्याची आत्या नाशिकला राहते. तर तिची शेजारीन आरोपी महिला ही दोन मुलांची आई आहे. जेव्हा जेव्हा हा मुलगा नाशिकला आत्याकडे जायचा तेव्हा ती त्याच्याशी बोलायची. याचवेळी त्या महिलेने मुलाला आपल्या जाळ्यात ओढले होते. एके दिवशी त्याला दारु पाजली आणि त्याला अश्लिल व्हिडीओ दाखविले. यानंतर तिने आपला डाव साधायला सुरुवात केली. हा मुलगा तिच्या पाशात पुरता गुंतला होता. घरीही दारु पिऊन येऊ लागला होता. अभ्यासही करत नव्हता. 

एके दिवशी तो तासंतास मोबाईल बोलत होता, त्याच्या वागण्यामुळे त्रासलेल्या आईने त्याचा मोबाईल चेक केला तेव्हा त्याच्या गॅलरीमध्ये त्याचे आणि त्या महिलेचे अश्लिल व्हिडीओ पाहिले आणि धक्काच बसला. याबाबत विचारताच त्याने सर्व सांगितले. आजतकने याची बातमी दिली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकkalyanकल्याण