शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! बॉयफ्रेंडला यायची जुन्या प्रेयसीची आठवण, गर्लफ्रेंडनं मुलीचा नग्न फोटो केला व्हायरल अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 13:53 IST

संबंधित अल्पवयीन मुलगी, तिचा प्रियकर आणि त्याची 20 वर्षीय जुनी प्रेयसी (जीने पोलिसांकडे तक्रार केली.) हे सर्व जण माहीममधीलच आहेत.

मुंबई शहर सायबर पोलिसांनी माहीम येथील एका 16 वर्षीय तरुणीला तिच्या प्रियकराच्या माजी प्रेयसीचे नग्न फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. संबंधित अल्पवयीन मुलगी, तिचा प्रियकर आणि त्याची 20 वर्षीय जुनी प्रेयसी (जीने पोलिसांकडे तक्रार केली.) हे सर्व जण माहीममधीलच आहेत.

एका पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे की, "जेव्हा 'ती' एक तरुणासोबत नात्यात होती, तेव्हा हे खासगी फोटो घेण्यात आले. दोघांचे ब्रेकअप झाले. यानंतर तो अल्पवयीन मुलीसोबत नाते प्रस्थापित करू लागला."

तक्रारदार महिलेने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली होती. यात, कुणी तरी आपले नग्न फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केले आहेत, असे म्हणण्यात आले होते. पोलिसांनी एका अज्ञात संशयिताविरोधात आयपीसीच्या कलम 354 डी, 509 आणि 67 ए अतर्गत तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी सर्वप्रथम तक्रारदाराचे खासगी फोटो अॅपवरून काढून टाकले. सुरुवातीला या कृत्यामागे तक्रारदाराच्या माजी प्रियकराचा हात असल्याचा संशय पोलिसांना होता, मात्र नंतर, सर्व्हीस प्रोव्हायडरने नग्न फोटो अपलोड करणाऱ्याचा फोन नंबर शेअर केल्यावर ती दुसरी-तिसरी कुणी नसून तीच अल्पवयीन मुलगी असल्याचे समोर आले.

आणखी एका पोलीस अधिकाऱ्याने म्हटले आहे, की संबंधित मुलीने चतुराईने आपल्या प्रियकराच्या वडिलांच्या फोनचा वापर करून नग्न फोटो अपलोड केले. तसेच तपासातून समोर आले आहे, की प्रियकरासोबत बोलताना त्याच्या तोंडून जुन्या प्रेयसीचे नाव वारंवार आल्याने, ती जेलस झाली. यानंतर तिने त्याला त्रास देण्याचा निर्णय घेतला. आता संबंधित अप्लवयीन मुलिलला डोंगरी येथील किशोर न्याय बोर्डासमोर हजर करण्यात येणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबईPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडिया