शहरं
Join us  
Trending Stories
1
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
2
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
3
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
4
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
5
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
6
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
7
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
8
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
9
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
10
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
11
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
12
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
13
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
14
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
15
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
16
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
17
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा
18
७ सीटर Kia Carens CNG मध्ये झाली लॉन्च; जाणून घ्या फिचर्स अन् किंमत, Ertiga ला देणार टक्कर
19
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
20
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?

संतापजनक! १९९९ रूपयांत 'महाकुंभ'मधील मुलींचे कपडे बदलतानाचे फोटो विक्रीला; FIR दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2025 13:12 IST

धक्कादायक म्हणजे हे व्हिडिओ, फोटो टेलीग्रामवर विकले जात आहेत. मेटा प्लॅटफॉर्मवरही काही व्हिडिओ फोटो शेअर केलेत. 

प्रयागराज - महाकुंभ मेळ्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक प्रयागराज इथं पोहचले. त्यात महिलाही अधिक होत्या. पवित्र गंगा स्नान करण्यासाठी भाविकांची गर्दी त्रिवेणी संगमावर झाल्याचं पाहायला मिळत होते. मात्र याच ठिकाणी महिलांचे कपडे बदलणारे आणि आंघोळीचे फोटो सोशल मीडियावर विक्री केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याचं गांभीर्य लक्षात घेऊन महाकुंभ परिसरातील कोतवाली पोलिसांनी १५ सोशल मिडिया चॅनेलविरोधात FIR दाखल केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

माहितीनुसार, कुंभ परिसरात महिलांचे स्नान केल्यानंतर कपडे बदलतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियाच्या टेलीग्रामवर १९९९ रुपयांना विकले जात आहेत. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी स्वत: पुढाकार घेत घटनेची एफआयआर दाखल केली आहे. प्रयागराज येथे गंगा स्नानासाठी आलेल्या महिला, मुलींचे खासगी व्हिडिओ, फोटो बनवून ते व्हायरल केले जात आहेत. हे व्हिडिओ आणि फोटो जेव्हा महिला त्रिवेणी संगमावर स्नान करत होत्या, त्यानंतर कपडे बदलण्यासाठी गेल्यानंतर रेकॉर्ड केले गेले. धक्कादायक म्हणजे हे व्हिडिओ, फोटो टेलीग्रामवर विकले जात आहेत. मेटा प्लॅटफॉर्मवरही काही व्हिडिओ फोटो शेअर केलेत. 

या प्रकरणाबाबत पोलिसांनी २ वेगवेगळे एफआयआर केलेत. इन्स्टाग्रामवरील neha1224872024 आणि सीसीटीव्ही चॅनेल ११ कडून महाकुंभसाठी आलेल्या महिलांचे स्नान करतानाचे व्हिडिओ, फोटो विविध किंमतीत उपलब्ध करून देण्याचा दावा करण्यात येत आहे. आता या प्रकरणात पोलिसांनी संबंधित युजर्सची मेटाकडून माहिती मागवली आहे. ज्या १५ अकाऊंटविरोधात पोलिसांनी FIR दाखल केलेत. त्यात  Girls Live Video (Facebook), Desi Bhabi Ji (Facebook), Rupola Rose (Facebook), Dwivedi rasiya @dwivedirasiya4271 (Youtube), Crush of Indian @CrushofIndians (Youtube), Mahakumbh-2025 @pkumar334 (Youtube), BABA KA VLOGEE Comedy @BABAKAVLOGEE440 (Youtube), Blogger Aabha Devi @BloggerAabhaDevi077k (Youtube), Roshan Desi Vlogs @roshandesivlogs4438 (Youtube), Kapil Tv @Kapiltv1 (Youtube), Mela Mahotsav @Mela-Mahotsav (Youtube), Pushpa village vlog @pushpavillagvlog (Youtube), Hindu Official 1.2M @hinduk7066 (Youtube), Play Tube @PlayTube7325 (Youtube), desi.rasiya.video @desi.rasiya.video (Instagram) या युजर्सचा समावेश आहे. 

दरम्यान, सोशल मीडिया मॉनिटरिंगवेळी महाकुंभमध्ये आलेल्या महिलांचे खासगी फोटो व्हायरल होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात आली. काही आक्षेपार्ह फोटो कंन्टेट म्हणून विकले जात आहेत. एका पोस्टमध्ये Cctv channel 11 नावाच्या टेलीग्राम पोस्टचा स्क्रिनशॉट्स लावला आहे ज्यात महिलांचे स्नान करतानाचे व्हिडिओ १९९९ रूपयात मेंबरशिप घेतल्यानंतर दिले जातील असं लिहिलेले आहे. पोलीस या प्रकरणी पुढील कारवाई करत आहेत.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाCrime Newsगुन्हेगारीSocial Mediaसोशल मीडिया