शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

महादेव बेटिंग अॅप प्रकरण; 2000 सिम कार्ड, 1700 बँक खाती अन् 15000 कोटींचा घोटाळा...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 3:42 PM

महादेव बेटिंग अॅपप्रकरणी पोलिसांनी अभिनेता साहिल खानला अटक केली असून, न्यायालयाने त्याला 1 मे पर्यंत कोठडी सुनावली आहे.

Mahadev Betting App : गेल्या काही काळापासून चर्चेत आलेल्या महादेव बेटिंग ॲपप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अभिनेता साहिल खानला मुंबई न्यायालयाने 1 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सायबर सेलच्या एसआयटीने शनिवारी साहिलला छत्तीसगडमधील जगदलपूर येथून ताब्यात घेतले होते. दरम्यान, मुंबई पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणात आतापर्यंत 2000 हून अधिक सिमकार्ड आणि 1700 बँक खात्यांचे तपशील जप्त केले आहेत. 

याप्रकरणी दुसरी अटक यापूर्वी 6 जानेवारी रोजी मुंबई पोलिसांनी बेटिंग ॲप प्रकरणात दीक्षित कोठारी नावाच्या आरोपीला अटक केली होती. मुंबईतून अटक करण्यात आलेला साहिल खान हा दुसरा आरोपी आहे. या वादग्रस्त प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली असून, ती महादेव बेटिंग ॲप आणि रिअल इस्टेट कंपनीमधील अवैध आर्थिक व्यवहार शोधणार आहे.  महादेव बॅटिंग ॲप प्रकरणी साहिल खान आणि अन्य 31 जणांविरुद्ध चौकशी सुरू आहे.

15 हजार कोटी रुपयांचा घोटाळाएसआयटी काही आर्थिक आणि रिअल इस्टेट कंपन्या आणि वादग्रस्त महादेव बेटिंग ॲपच्या प्रवर्तकांमधील कथित बेकायदेशीर व्यवहारांची चौकशी करत आहे. गेल्या वर्षी न्यायालयाच्या आदेशानंतर माटुंगा पोलिसांनी महादेव बेटिंग ॲपबाबत एफआयआर नोंदवून या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली होती. एफआयआरनुसार हा सुमारे 15,000 कोटी रुपयांचा घोटाळा आहे.

ईडी आणि मुंबई पोलिसांचा तपास सुरूपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान आरोपींची बँक खाती, मोबाईल फोन, लॅपटॉप आणि सर्व तांत्रिक उपकरणांची माहिती गोळा केली जात आहे. अंमलबजावणी संचालनालय (ईडी) महादेव सट्टेबाजी ॲप प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगच्या अँगलने तपास करत आहे. त्याचबरोबर मुंबई पोलिसांनी 32 जणांविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. छत्तीसगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो (ACB) आणि आर्थिक गुन्हे शाखे (EOW) ने सांगितले की,या प्रकरणात अनेक ज्येष्ठ राजकारणी आणि नोकरशहा यांचाही सहभाग असल्याचे मानले जात आहे. 

ॲपवर केंद्राने घातली बंदी 5 नोव्हेंबर 2023 रोजी केंद्र सरकारने महादेव बेटिंग ॲपसह 22 बेकायदेशीर बेटिंग ॲप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते. ईडीच्या शिफारशींनंतर माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69 ए अंतर्गत आदेश जारी करण्यात आले. महादेव ॲप प्रकरण तेव्हा चर्चेत आले, जेव्हा ईडीने कॅश कुरिअरचे ईमेल स्टेटमेंट रेकॉर्ड केल्याचा दावा केला, ज्याने उघड केले की, छत्तीसगडचे तत्कालीन मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी यूएई-आधारित ॲप प्रवर्तकांकडून कथितपणे 508 रुपये घेतले होते कोटी घेतले होते. मात्र, बघेल यांनी आरोप फेटाळून लावले.

आतापर्यंत किती तपास झाला?ईडीपूर्वी छत्तीसगड पोलिसांनी महादेव ॲपविरोधात तपास सुरू केला होता. मीडिया रिपोर्टनुसार, छत्तीसगड पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत 75 एफआयआर नोंदवले आहेत. तर 429 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 15 सप्टेंबर रोजी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ईडीने सांगितले होते की, या प्रकरणी रायपूर, भोपाळ, मुंबई आणि कोलकाता येथील 39 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. आतापर्यंतच्या छाप्यांमध्ये ईडीने 417 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. याशिवाय ईडीने फरार संशयितांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटही जारी केले आहे.

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइमCentral Governmentकेंद्र सरकार