ड्रग्ज तस्करीच्या एमपी-ठाणे कनेक्शनचा पर्दाफाश; पाच जणांच्या टाेळीला ठाेकल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2026 12:28 IST2026-01-20T12:27:51+5:302026-01-20T12:28:28+5:30

२७ कोटींचे १३ किलाे एमडी जप्त

madhya pradesh thane connection of drug smuggling exposed Five arrested | ड्रग्ज तस्करीच्या एमपी-ठाणे कनेक्शनचा पर्दाफाश; पाच जणांच्या टाेळीला ठाेकल्या बेड्या

ड्रग्ज तस्करीच्या एमपी-ठाणे कनेक्शनचा पर्दाफाश; पाच जणांच्या टाेळीला ठाेकल्या बेड्या

लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणेमध्य प्रदेशातून (एमपी) महाराष्ट्रात होणाऱ्या ड्रग्ज तस्करीचा ठाणे पोलिस दलाच्या मुंब्रा पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत बासू सय्यद याच्यासह पाच जणांना गजाआड करण्यात आले. या टोळक्यांकडून २७ काेटी २१ लाख ७७ हजार ७५० रुपयांचे १३ किलाे ६२९ ग्रॅम एमडी हस्तगत केल्याची माहिती ठाणे शहर परिमंडळ एकचे   पाेलिस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी साेमवारी दिली.

मुंब्र्यामध्ये ड्रग्ज तस्करी होणार असल्याची माहिती मुंब्रा पाेलिसांना मिळाली. त्याआधारे ११ जानेवारीला वरिष्ठ पाेलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या  मार्गदर्शनाखाली निरीक्षक शरद कुंभार, सहायक पाेलिस  निरीक्षक राेहित केदार, गणेश जाधव आणि उपनिरीक्षक राम दळवी यांच्या पथकाने बिलाल हॉस्पिटलजवळ सापळा लावला. या कारवाईत बासू उमरद्दीन सय्यद (रा. मुंब्रा)   याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २३.५ ग्रॅम एमडी जप्त केले. चौकशीदरम्यान एमडी मध्य प्रदेशातून आणल्याची माहिती  समोर आली. त्यानुसार मध्य प्रदेशातून मुंब्रा, ठाण्यात ड्रग्जची तस्करी करणाऱ्या रामसिंग गुज्जर (४०) आणि कैलास बलई (३६) या दोघांनाही अटक केली. त्यांच्याकडून ७  कोटी ३०  लाख ५७  हजारांचे ३ किलाे ५१५ ग्रॅम एमडी जप्त केले.

मुंब्रा पोलिसांत गुन्हा दाखल

दोघांच्या चाैकशीत हे ड्रग्ज मध्य प्रदेशातील रतलाममधून आणल्याचे समजले. त्यानंतर मुंब्रा पोलिसांचे एक पथक थेट रतलाम जिल्ह्यात धडकले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुंब्रा पोलिसांनी मनोहरलाल गुज्जर, रियाज मन्सुरी यांना अटक केली.  त्यांच्याकडून १९  कोटी  ९१ लाख रुपयांचे ९९  किलो ९५६  ग्रॅम एमडी जप्त केले. याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title : एमपी-ठाणे ड्रग तस्करी का भंडाफोड़; पांच गिरफ्तार, करोड़ों का माल जब्त।

Web Summary : ठाणे पुलिस ने एमपी-महाराष्ट्र ड्रग तस्करी गिरोह का पर्दाफाश किया, बासू सैय्यद समेत पांच गिरफ्तार। ₹27.21 करोड़ का एमडी जब्त। ड्रग्स मध्य प्रदेश से लाए गए थे, जिससे रतलाम में और गिरफ्तारियां हुईं। मुंब्रा पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : MP-Thane drug racket busted; five arrested with crores worth MD.

Web Summary : Thane police exposed an MP-Maharashtra drug trafficking ring, arresting five including Basu Sayyed. They seized MD worth ₹27.21 crore. The drugs were sourced from Madhya Pradesh, leading to further arrests in Ratlam. Mumbra police are investigating the case.