मध्यप्रदेशमध्ये वृद्धेच्या घरात घुसून घरफोडी करणारी दुकली उल्हासनगरात जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 18:53 IST2020-12-15T18:49:28+5:302020-12-15T18:53:27+5:30
House Breaking : चोरट्यांनी चोरीची कबुली दिली असून चोरांना मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचे माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली आहे.

मध्यप्रदेशमध्ये वृद्धेच्या घरात घुसून घरफोडी करणारी दुकली उल्हासनगरात जेरबंद
उल्हासनगर : मध्यप्रदेशमध्ये एका वृद्धेच्या घरात जबरीने घुसून घरफोडी करणाऱ्या दोन चोरांना शहर गुन्हे अन्वेषण विभागाने जेरबंद केले. चोरट्यांनी चोरीची कबुली दिली असून चोरांना मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याचे माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली आहे.
मध्यप्रदेश इंदोर जिल्ह्यातील अन्नपूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका वृद्धेच्या घरात ९ डिसेंबर रोजी दुपारी साडे १२ वाजता आनंद मंडल व मुकेश खूबचंदानी यांनी जबरीने घुसून कपाटातून ५० हजाराचे दागिने घेऊन पोबारा केला. याप्रकरणी अन्नपूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. चोरटे उल्हासनगरात आल्याच्या संशयावरून मध्यप्रदेश पोलिसांनी शहर गुन्हे अन्वेषण विभागाला याबाबत माहिती दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस पथकाने घटनेचा सीसीटीव्ही कॅमेरे फुटेज व मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण याद्वारे आनंद मंडल याला डोंबिवली येथील खोनी फाटा तर मुकेश खूबचंदानी याला शहरातील शिवाजी चौक परिसरातून जेरबंद करण्यात यश आले. त्यांनी चोरीची कबुली दिली असून काही प्रमाणात चोरीचे दागिने जप्त केले.
मध्यप्रदेशच्या अट्टल घरफोडी चोरांना शहर गुन्हे अन्वेषण विभागाने एका आठवड्यात जेरबंद केले. चोरट्याने चोरीची कबुली दिली असून त्यांना मध्यप्रदेश पोलिसांच्या ताब्यात देणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी दिली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.