१० महिन्यांत तिप्पट रक्कम देण्याचे अमिष, एक काेटींची फसवणूक; गंडा घालणाऱ्या दोघांना अटक
By जितेंद्र कालेकर | Updated: August 15, 2022 00:03 IST2022-08-15T00:02:02+5:302022-08-15T00:03:50+5:30
ठाण्यातील महाकाली ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक रितेश पांचाळ आणि मोहन पाटील यांनी महाकाली ग्रुप ऑफ कंपनीच्या (एसएमजीसी) वागळे इस्टेट येथील दोस्ती पिनाकल इमारतीमध्ये कायार्लय थाटले हाेते.

१० महिन्यांत तिप्पट रक्कम देण्याचे अमिष, एक काेटींची फसवणूक; गंडा घालणाऱ्या दोघांना अटक
ठाणे- अवघ्या दहा ते २० महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांना तिप्पट रक्कम देण्याच्या अमिषाने सुमारे एक काेटींचा गंडा घालणाऱ्या रितेश शिकलीगर उर्फ रितेश पांचाळ (४३, पवई पार्क सोसायटी, हिरानंदानी मुंबई ) आणि मोहन पाटील (५२, रा. किसन नगर, ठाणे) या दाेघांना अटक केल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरक्त पाेलीस आयुक्त अशाेक माेराळे यांनी रिववारी दिली. या दाेघांनाही १६ ऑगस्टपर्यंत पाेलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ठाण्यातील महाकाली ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक रितेश पांचाळ आणि मोहन पाटील यांनी महाकाली ग्रुप ऑफ कंपनीच्या (एसएमजीसी) वागळे इस्टेट येथील दोस्ती पिनाकल इमारतीमध्ये कायार्लय थाटले हाेते. त्यांनी द मॅजिक थी एक्स (एसएमपी टोकण) या याेजनेमध्ये गुंतवणुक केल्यास गुंतवणूक रकमेप्रमाणे दहा ते २० महिन्यांमध्ये गुंतवणुक रकमेच्या तिप्पट स्वरुपात आकर्षक असा परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून तक्रारदारांना २४ हजार रुपये आणि इतर १५ ते २० गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास भाग पाडून त्यांची एक काेटीहून अधिकची फसवणूक केली.
याप्रकरणी त्यांच्यािवरुद्ध् फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंधांचे संरक्षण करण्याचा अधिनियम कायदयाखाली १० ऑगस्ट २०२२ राेजी गुन्हा दाखल झाला हाेता. याच गुन्ह्यात रितेश पांचाळ आणि मोहन पाटील या दाेघांना सह पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उप आयुक्त सुनिल लोखंडे आणि सहायक पोलीस आयुक्त अरविंद वाढणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रकांत काटकर यांच्या पथकाने १० ऑगस्ट राेजी अटक केली. अशाच प्रकारे अन्य काेणाचीही फसवणूक झाली असल्यास त्यांनी ठाणे आर्थिक गुन्हे शाखेकडे संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.