The lure of attractive interest rates duped lakhs rupees of the lawyer | आकर्षक व्याजदराच्या आमिषाने वकिलाला घातला लाखोंचा गंडा 
आकर्षक व्याजदराच्या आमिषाने वकिलाला घातला लाखोंचा गंडा 

ठळक मुद्देआरोपींनी जेपीव्ही कॅपिटल्स इन्व्हेस्टमेंट नावाची कंपनी स्थापन केली होती.टप्याटप्यानं संबंधितांनी तक्रारदार वकिलाकडून तब्बल २४ लाख रुपये उकळले.

 

मुंबई - आकर्षक व्याजदराचं आमिष दाखवून खारमधील एका प्रसिद्ध वकिलाला ५ जणांनी २४ लाखांना गंडा घातला. या प्रकरणी जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. खार परिसरात राहणारे तक्रारदार वकिलांना आरोपी विरेंद्र विश्वदिया, दिव्यकांत विश्वदिया, तुषार पांचाळ, कमलेश पटेल, वासाराम वसावाधिया अशी या आरोपींची नावं आहेत. 

आरोपींनी जेपीव्ही कॅपिटल्स इन्व्हेस्टमेंट नावाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीतील विविध गुंतवणूकीवर आकर्षक योजना ठेवल्या होत्या. या आरोपींनी तक्रारदार वकिलांना पैसे गुंतवणुकीवर जादा आकर्षक व्याजदराचं आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढलं आहे. टप्याटप्यानं संबंधितांनी तक्रारदार वकिलाकडून तब्बल २४ लाख रुपये उकळले. गुंतणुकीची खोटी कागदपत्रही देण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसातच या आरोपींना कार्यालय बंद करून पळ काढल्याची माहिती वकिलाला मिळाली. आपली फसवणूक केल्याप्रकरणी वकिलाने जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.


Web Title: The lure of attractive interest rates duped lakhs rupees of the lawyer
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.