Lucky Dog escapes with unknown; Filed a complaint at the police station | लकीला लघुशंका करताना पळवलं; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

लकीला लघुशंका करताना पळवलं; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

ठळक मुद्देसोमवारी सायंकाळी अशोक साहू हे आपला पाळलेला कुत्रा लकी याला राजा राममोहन रॉय मार्गावर फेरफटका मारायला घेऊन गेले होते. अनेक सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर शेवटी मला एका फुटेजमध्ये एक गुलाबी पठानी परिधान केलेली व्यक्ती लकीला घेऊन जाताना दिसली.

मुंबई - ग्रँट रोड येथे लॅब्राडोर प्रजातीच्या एका सहा वर्षाच्या कुत्र्याला लघुशंका करत असताना पळवून नेल्याची घटना घडली आहे. लकी असं या पाळीव कुत्र्याचे नाव असून या कुत्र्याचे मालक अशोक साहू यांनी याबाबत डी.बी.मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सोमवारी सायंकाळी अशोक साहू हे आपला पाळलेला कुत्रा लकी याला राजा राममोहन रॉय मार्गावर फेरफटका मारायला घेऊन गेले होते. त्यावेळी लकीला लघुशंका आल्याने त्याने थोड्या वेळासाठी त्याच्या गळ्यातील पट्टा काढून त्याला मोकळं सोडलं. याच दरम्यान एका अज्ञात इसमाने साहू यांची नजर चुकवून लकीला पळवले. त्यानंतर साहू यांनी लेकीला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, लकी त्यांना कुठेच दिसला नाही की सापडला नाही. त्यांना असे वाटले की लकी कुठेतरी वाट चुकला असेल म्हणून त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. लकी स्वतःहून घरचा मार्ग शोधून घरी गेला नसेल असे साहू यांना वाटले म्हणून त्यांनी घरी फोन करून याबाबत विचारणा केली. लकीचा खूप शोध घेतल्यानंतर त्यांनी प्राणीमित्र कार्यकर्त्या सोनाली वाघमारे आणि अल्फा फाउंडेशनच्या सीमा टंक यांना संपर्क साधून पोलिसात तक्रार नोंदवली.

साहू यांनी पोलिसात तक्रार नोंदवण्याआधी मी लकीचा शोध घेतला. दरम्यान, मी वेगवेगळ्या दुकानात जाऊन दुकाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेज दाखवण्यास सांगितले. अनेक सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर शेवटी मला एका फुटेजमध्ये एक गुलाबी पठानी परिधान केलेली व्यक्ती लकीला घेऊन जाताना दिसली. लकीला त्याने पळवून नेल्याचे साहूने पोलिसांना सांगितले. 

Web Title: Lucky Dog escapes with unknown; Filed a complaint at the police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.