शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
3
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
4
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
5
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
6
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
7
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
8
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
9
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
10
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
11
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
12
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
13
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
14
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
15
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
16
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
17
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
18
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
19
रिअलमीचा धमाका! ७०००mAh बॅटरीसह Realme Narzo 90 सिरीज भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत
20
हायड्रोजन कारची जगातील पहिली क्रॅश टेस्ट झाली; ह्युंदाई नेक्सो किती आहे सुरक्षित...
Daily Top 2Weekly Top 5

"मी जीव द्यायला जातेय" म्हणत भाजपा खासदाराच्या सुनेनं केला आत्महत्येचा प्रयत्न; पतीवर केले गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 09:21 IST

BJP Kaushal Kishore Daughter in law Suicide : आत्महत्येआधी अंकिता यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी "मी जीव द्यायला जातेय" असं म्हटलं आहे.

नवी दिल्ली - लखनऊच्या मोहनलालगंज मतदारसंघातून भाजपाचे खासदार असणाऱ्या कौशल किशोर (Kaushal Kishore) यांच्या सुनेने आत्महत्या (Suicide) करण्याचा प्रयत्न केला आहे. खासदारांची सून अंकिता यांनी खासदारांच्या घराबाहेर आपल्या हाताची नस कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने अंकिता यांना रुग्णालयात दाखल केलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आत्महत्येआधी अंकिता यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी "मी जीव द्यायला जातेय" असं म्हटलं आहे.

अंकिता यांनी आपले पती आयुष यांच्यावर देखील गंभीर आरोप केले आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. व्हिडीओमध्ये अंकिताने आपण आत्महत्या करायला जात असल्याचं म्हटलं आहे. त्यानंतर त्या आपल्या स्कूटीने खासदारांच्या दुबग्गा येथील घरी पोहोचल्या. तिथे त्यांनी आपल्या हाताची नस कापून घेतल्याचं म्हटलं जात आहे. "मी कोणासोबत लढू शकत नाही कारण तुमचे वडील हे खासदार आहे. माझं कोणीच ऐकणार नाही. आजपर्यंत कोणीच तुम्हाला हात लावला नाही. मग मी कशी तुम्हाला मारू शकते" असं अंकिता यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. 

"तुम्ही आणि तुमच्या घरचे मला जगू देत नाहीत"

"तुम्ही किती खोटं बोलत आहात. तुम्ही आणि तुमच्या घरचे मला जगू देत नाहीत. घराचं भाडं भरलं नाही, सिलिंडर नाही, मी काय खात असेल याचा कधी विचार केला का?, जर तुम्ही माझ्य़ाकडे येणार नसाल तर मला राहायचं देखील नाही. मी जातेय. तुम्ही नेहमीच माझी आठवण काढाल. माझ्या मृत्यूचं कारण तुम्ही आणि तुमच्या घरचे आहेत. मी जाते आहे" असं अंकिता यांनी आत्महत्येपूर्वी केलेल्या एका व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. याआधी अंकिता यांनी आपला पती आयुषच्या नार्को टेस्टची मागणी केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भयंकर! भाजपा खासदाराच्या मुलावर भररस्त्यात गोळीबार, चौकशीतून धक्कादायक सत्य झालं उघड

काही दिवसांपूर्वी  भाजपा खासदार कौशल किशोर यांचा मुलगा आयुष किशोर याच्यावर काही अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली होती. आयुषच्या मेव्हण्याला या प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडे याबाबत कसून चौकशी केली असता त्याने आयुषने स्वत:च आपल्यावर गोळीबार करवून घेतला होता. या गोळीबाराच्या प्रकरणात पाच - सहा जणांना अडकवण्यासाठी त्यानं हा कट रचल्याची माहिती दिली आहे. आदर्श असं मेव्हण्याचं नाव असून त्याने गोळीबार केल्याचं कबूल केले आहे. तसेच काही लोकांची नावं देखील सांगितली आहेत. "आयुषने पाच - सहा लोकांना अडकवण्यासाठी हा कट रचला होता. चंदन गुप्ता, मनिष जयस्वाल आणि प्रदीप कुमार सिंह यांच्यासोबत आणखी दोन जण होते परंतु, त्यांची नावं मला माहीत नाहीत."

"आयुषच्या सांगण्यावरून मी फक्त समोरून गोळी झाडली होती" अशी माहिती आदर्शने दिली आहे. मोहनलालगंजचे भाजपा खासदार कौशल किशोर यांनी मुलगा आयुषने प्रेमविवाह केल्यानंतर आपण त्याच्याशी सगळे संबंध तोडले होते. त्याने आपल्याला आत्महत्येची धमकी दिली होती असं म्हटलं आहे. यानंतर आयुष आपल्या नाराज कुटुंबीयांपासून वेगळा राहत असल्याची माहिती दिली. गोळीबाराच्या घटनेनंतर आयुषला जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. आयुषची पत्नी आणि मेव्हण्यावर संशय असल्याने पोलिसांनी आदर्शला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केल्यानंतर सत्य समोर आलं.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसBJPभाजपा