55 वर्षांच्या चुलत भावाचा 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 19:23 IST2019-07-02T19:22:32+5:302019-07-02T19:23:54+5:30

55 वर्षांच्या चुलत भावानं 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे.

lucknow city cousin arrested for physical harassment teenager | 55 वर्षांच्या चुलत भावाचा 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

55 वर्षांच्या चुलत भावाचा 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

लखनऊः 55 वर्षांच्या चुलत भावानं 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आहे. उत्तर प्रदेशमधल्या कृष्णानगरमधील कोतवाली भागात नात्याला काळिमा फासणारी ही घटना घडली आहे. ती युवती सहा महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला, त्या चुलत भावानं तिला याची कुठेही वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. गर्भवती राहिल्यानंतर त्या युवतीनं सर्व प्रकार घरच्यांना सांगितला.

त्या तरुणीच्या वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी सुरेश श्रीवास्तव, त्याची पत्नी शशी श्रीवास्तव आणि पवन श्रीवास्तव यांच्याविरोधात अत्याचार, धमकी, पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. पीडितेला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आलं आहे. तसेच आरोपींना तुरुंगात टाकण्यात आलं आहे.

ती अल्पवयीन मुलगी 10वीच्या वर्गात शिकत होती. या प्रकारानंतर तिनं शाळेत जाणं बंद केलं. त्यामुळे तिला पुढचं शिक्षण घेता आलं नाही. त्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, तो माझ्या मुलीला लांगुलचालन देऊन घरी बोलवत होता आणि जबरदस्तीनं तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. तोंड उघडल्यास तुझ्या आई-वडिलांना ठार करण्याची धमकीही दिली होती. 

Web Title: lucknow city cousin arrested for physical harassment teenager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.