'प्रेयसीच्या भावाने माझ्या १३ वर्षाच्या मुलीला पळवून नेलं', सुसाइड नोट लिहून व्यक्तीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 18:37 IST2022-05-05T18:36:01+5:302022-05-05T18:37:33+5:30
Madhya Pradesh Crime News : आझाद नगरमध्ये राहणारा रतन कुमारने आपल्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुसाइड नोटच्या आधारावर पोलिसांनी चौकशी सुरू केली तर धक्कादायक खुलासे झाले.

'प्रेयसीच्या भावाने माझ्या १३ वर्षाच्या मुलीला पळवून नेलं', सुसाइड नोट लिहून व्यक्तीची आत्महत्या
Madhya Pradesh Crime News : -illicit-relation-daughter-love-story-indoreमध्य प्रदेशच्या इंदुरमधील आझाद नगर भागातून अनैतिक संबंधाची एक वेदनादायी घटना समोर आली आहे. पोलिसांनी सांगितलं की, रतन कुमार (काल्पनिक नाव) आणि संगीता (काल्पनिक नाव) यांच्यात तीन वर्षांपासून अनैतिक संबंध होते. यादरम्यान संगीताचा भाऊ रतन कुमारच्या १३ वर्षी मुलीा घेऊन पळाला आणि गेल्या एका वर्षापासून त्याने तिला त्याच्यासोबत ठेवलं आहे. अशात रतन कुमारने सुसाइड नोट लिहून घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
आझाद नगरमध्ये राहणारा रतन कुमारने आपल्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सुसाइड नोटच्या आधारावर पोलिसांनी चौकशी सुरू केली तर धक्कादायक खुलासे झाले. रतन कुमारचं गेल्या तीन वर्षांपासून संगीता नावाच्या महिलेसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. साधारण एक वर्षाआधी रतनच्या प्रेयसीचा म्हणजे संगीताचा भाऊ रतनच्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला घेऊन पळाला होता.
रतनला याबाबत पोलिसात तक्रार करायची होती. पण प्रेयसीने त्याला प्रेमाचा हवाला देत असं करण्यापासून रोखलं आणि म्हणाली की, तिच्या भावाला तुझ्या मुलीशी लग्न करायचं आहे. रतन प्रेयसीला अनेकदा म्हणाला की, त्याच्या मुलीला परत पाठव. पण प्रेयसीने तसं काही केलं नाही. त्यामुळे निराश रतन कुमारने आत्महत्या केली. त्याआधी त्याने एक सुसाइड नोट लिहून ठेवली. ज्यात त्याने प्रेयसीवर आरोप लावले आणि मुलीच्या अपहरणाबाबतही सांगितलं.
पोलीस अधिकारी वीडी भारती म्हणाले की, रतन कुमारने सुसाइड नोटमध्ये लिहिलं की, 'मी रतन कुमार आत्महत्या करत आहे. माझी महिला मित्र संगीता जी बिचोली मर्दानामध्ये राहते. तिने माझा तीन वर्ष वापर केला. तिचा भाऊ माझ्या १३ वर्षाच्या मुलीला आपल्या गावी घेऊन गेला. संगीताने मला कायदेशीर तक्रार करू दिली नाही. माझ्या मृत्यूला संगीता, तिचा पती, भाई आणि तिचे आई-वडील जबाबदार आहेत. त्यांना याची शिक्षा मिळावी'.
पोलीस या प्रकरणाची गंभीरतेने चौकशी करत आहेत. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितलं की, चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.