"20 रुपये देऊन तो आमच्या मम्मीला घेऊन गेला"; 2 लेकरांनी सांगितलं महिलेचं प्रेमप्रकरण अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2022 16:19 IST2022-05-27T16:16:02+5:302022-05-27T16:19:09+5:30

पली मुलं, पती आणि संसार सोडून ही महिला प्रियकरासोबत पळून गेल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

lover took away woman from bagaha by handing her 20 rupees to children husband was pleading for justice police station | "20 रुपये देऊन तो आमच्या मम्मीला घेऊन गेला"; 2 लेकरांनी सांगितलं महिलेचं प्रेमप्रकरण अन्...

"20 रुपये देऊन तो आमच्या मम्मीला घेऊन गेला"; 2 लेकरांनी सांगितलं महिलेचं प्रेमप्रकरण अन्...

नवी दिल्ली - प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. त्याचे काही भन्नाट किस्सेही याआधी अनेकदा समोर आले आहेत. अशीच एक घटना आता घडली आहे. दोन चिमुकल्यांना सोडून एक महिला तिच्या तिच्या प्रियकरासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे. आपली मुलं, पती आणि संसार सोडून ही महिला प्रियकरासोबत पळून गेल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. मुख्य म्हणजे या महिलेने मुलांना 20 रुपये देऊन खाऊ आणायला दुकानात पाठवलं आणि नंतर प्रियकरासोबत निघून गेली. 

आई पळून गेल्याने मुलांची अवस्था रडून रडून अत्यंत वाईट झाली आहे. तर पत्नी अचानक पळून गेल्याने पतीलाही धक्का बसला. पत्नी पळून गेलीये हे लोकांना सांगावं तरी कसं आणि तिला शोधावं तरी कसं? असा प्रश्न या पतीला पडला होता. पण नंतर त्याने हिंमत करत नातेवाईकांना घडलेला प्रकार सांगितला आणि पोलिसांत तक्रारही दिली. बिहारमध्ये ही घटना  घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बथवारिया पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका महिलेला तिच्या प्रियकराने 20 रुपये दिले. ते पैसे त्याने तिच्या मुलांना द्यायला सांगितले आणि चॉकलेट, बिस्किट आणायला दुकानात पाठवले. 

तुम्ही चॉकलेट आणि बिस्किट आणून खाऊन घ्या, मी बँकेत पैसे काढायला जाते, असं सांगितलं. मुलं चॉकलेट आणि बिस्किटे घेऊन परतली तेव्हा त्यांची आई घरात नव्हती आणि तिच्यासोबत असणारा तिचा प्रियकरही नव्हता. बिस्किटे खाल्ल्यानंतर मुलांनी आई परत येण्याची वाट पाहिली, पण ती परत आलीच नाही. मुलांनी घडलेला सर्व प्रकार वडिलांना सांगितला. मुलांनी सांगितलेलं ऐकताच त्यांना धक्का बसला आणि तिला कसं शोधावं, नातेवाईकांना काय सांगावं? असा प्रश्न त्याला पडला. 

शेवटी नातेवाईकांना सांगितलं आणि त्यांच्याकडेही तिचा शोध घेतला, परंतु तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर त्याने पोलिसांत तक्रार करण्याचा निर्णय घेतला. पतीने पोलीस ठाण्यात जाऊन एका व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली. महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की, "मला दोन मुलं आहेत. 24 मे 2022 रोजी माझ्या पत्नीने मुलांना 20 रुपये दिले आणि म्हणाली की तुम्ही दुकानातून चॉकलेट, बिस्किटं आणून खा, मी बँकेतून पैसे घेऊन येत आहे. परंतु, त्यानंतर ती परतली नाही." याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून तपास केला जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: lover took away woman from bagaha by handing her 20 rupees to children husband was pleading for justice police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.