आश्चर्यकारक! असा घेतला सूड; प्रेयसीने प्रियकराच्या भावी पत्नीचे केस कापले अन् फेविक्विकने डोळे चिटकवले
By पूनम अपराज | Updated: December 2, 2020 23:40 IST2020-12-02T23:36:15+5:302020-12-02T23:40:52+5:30
Crime News : घटनेची माहिती मिळताच डीएसपी संजय कुमार गावात पोहोचले आणि प्रकरणाची माहिती घेतली. सुरक्षेसाठी गावात पोलिस तैनात आहेत.

आश्चर्यकारक! असा घेतला सूड; प्रेयसीने प्रियकराच्या भावी पत्नीचे केस कापले अन् फेविक्विकने डोळे चिटकवले
बिहारमधील नालंदामधून एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचा विश्वासघात केल्याने प्रेयसीने असे कृत्य केले की पाहणारे अवाक झाले. प्रेयसीने प्रथम तिच्या प्रियकराची नववधूचे केस कापले आणि नंतर तिचे डोळे केविक्विकने चिकटवले. एवढेच नव्हे तर त्याने वधूला जोरदार मारहाणही केली. मंगळवारी रात्री ही घटना घडली असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तरूणी तिचा प्रियकर गोपाल राम याच्या लग्नाने नाराज होती. लग्न १ डिसेंबरला शेखपुरा जिल्ह्यातील एका गावात झालं होतं.
नालंदामध्ये ही घटना चर्चेचा विषय बनला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि तपास सुरू केला. असं म्हटलं जात आहे की लग्नाआधी आरोपी मुलीचा आणि या नवरदेव मुलाचे अफेअर सुुरु होते. पण तिने १ डिसेंबर रोजी शेखपुरा जिल्ह्यात दुसर्या मुलीशी लग्न केले. प्रियकराच्या लग्नाच्या बातमीने प्रेयसी इतकी संतापली की ती बदला घेण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली. तिथे तिने झोपेेत असलेेल्या वधूचे केस कापले आणि फेेेवीक्विकने डोळे चिकटवले. यानंतर वधूला मारहाणही केली. ती वेदनांनी ओरडू लागली. गोंगाट ऐकून नातेवाईक झोपेेतूून जागे झालेे आणि त्यांनी मैत्रिणीला पकडले.
पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपी महिलेला ताब्यात घेतले. त्याचवेळी वधूला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तिची चिंताजनक आहे. ही घटना भागणबिघा पोलीस स्टेशन परिसरातील मोरा तालाब गावची आहे. घटनेची माहिती मिळताच डीएसपी संजय कुमार गावात पोहोचले आणि प्रकरणाची माहिती घेतली. सुरक्षेसाठी गावात पोलिस तैनात आहेत.