कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 15:34 IST2025-07-19T15:34:05+5:302025-07-19T15:34:49+5:30
५ वर्षापूर्वी विकासचे पूजासोबत लग्न झाले होते. विकासच्या कुटुंबात पत्नीसोबत आई-वडील, २ भाऊ, एक बहीण आणि ४ वर्षाचा मुलगा आहे.

कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
नवी दिल्ली - दिल्लीच्या निहाल विहार परिसरातील कुंवर सिंह नगरमध्ये विकास नावाच्या एका युवकाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. पोस्टमोर्टमनंतर त्याचा मृतदेह कुटुंबाला सुपूर्द केला आहे. विकासने कर्ज आणि पत्नीच्या वागणुकीला कंटाळून नैराश्येत आत्महत्या केली असा आरोप त्याच्या घरच्यांनी केला. त्याची पत्नी खूप दिवसांपासून माहेरी राहत होती. आत्महत्येआधी विकासने व्हिडिओ रेकॉर्डिंग केली होते त्याआधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.
माहितीनुसार, विकास पश्चिम विहारच्या ज्वालाहेडी मार्केटमधील फुटवेअर शॉपमध्ये काम करायचा. त्याचे कुटुंब कुंवर सिंह नगरच्या डी ब्लॉकमध्ये राहायचे. बुधवारी सकाळी ९.४६ वाजता पोलीस कंट्रोल रूमला एका घरी युवकाने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह पाहिला. विकास असं या मृत युवकाचे नाव असून त्याचे वय ३१ वर्ष होते. पंख्याला फास लटकावून त्याने जीव दिला. विकासला एक ४ वर्षाचा मुलगाही होता. जो त्याच्या आजीसोबत खालच्या खोलीत राहत होता.
५ वर्षापूर्वी विकासचे पूजासोबत लग्न झाले होते. विकासच्या कुटुंबात पत्नीसोबत आई-वडील, २ भाऊ, एक बहीण आणि ४ वर्षाचा मुलगा आहे. त्याच्या पत्नीचे घरचेही निहाल विहारच्या दुसऱ्या गल्लीत राहतात. विकास आणि पूजा यांच्यात ३ वर्षापासून वाद होता. विकासला त्याच्या पत्नीवर संशय होता, ती अन्य कुठल्या युवकासोबत मैत्री ठेवते असं त्याला वाटायचे. ज्यावेळी विकासने पंख्याला दोर बांधत होता तेव्हा त्याची आई त्याला आवाज देत होती परंतु विकास काही ऐकत नव्हता. मुलाला बऱ्याचदा आवाज दिला मात्र त्याने ऐकूनही न ऐकल्यासारखे केले.
विकास-पूजाचं लव्ह मॅरेज झाले होते
विकासचा भाऊ नितीनने सांगितले की, विकासने मृत्यूपूर्वी मोबाईलवर व्हिडिओ बनवला होता, त्यावेळी रात्रीचे ११.१८ वाजले होते. तर विकास आणि पूजाचे कोर्टात लव्ह मॅरेज झाले होते परंतु काही काळातच दोघांमध्ये भांडण सुरू झाले. वारंवार पूजा तिच्या माहेरी जायची. तिने विकासचा नंबर ब्लॉकही केला होता. कोर्टात तुला खेचणार असं ती बोलायची असं मृत युवकाच्या बहिणीने सांगितले. आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या ६ मिनिटांच्या व्हिडिओत विकास वारंवार पत्नीवर खूप प्रेम करतोय असं म्हणत होता. कर्जामुळेही विकास त्रस्त झाला होता.