Lost And Found : नौपाडा पोलिसांनी चोरीस गेलेले चार मोबाईल केले परत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2022 21:23 IST2022-07-25T21:22:41+5:302022-07-25T21:23:22+5:30
Crime News : एका आठवड्यातील कामगिरी; नागरिकांनी व्यक्त केले समाधान

Lost And Found : नौपाडा पोलिसांनी चोरीस गेलेले चार मोबाईल केले परत
ठाणे: अवघ्या आठवडाभरात नौपाडा पोलिसांनी चोरीस गेलेले चार मोबाइल नागरिकांना परत मिळवून दिल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सोमवारी दिली. आपले मोबाइल सुखरूप मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
नौपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून १६ ते २३ जुलै २०२२ या कालावधीमध्ये चोरीस गेलेले तसेच गहाळ झालेले हे मोबाइल तक्रारदारांना सुपुर्द करण्यात आले. आयुष कोठारी, पूजा पाडगावकर, अजय पंडित, विशाल पवार यांचे मोबाइल चोरीस गेले किंवा गहाळ झाले होते. वेगवेगळ्या पोलीस अधिकारी व शिपाई यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हे मोबाइल शोधून त्यांच्या हवाली केले.