शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बापरे! सासरी जाणाऱ्या नववधूला लागली तहान; पाणी आणण्यासाठी नवरदेव गेला अन् हैराण झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2021 22:36 IST

Crime News : लग्नानंतर राजू आपल्या पत्नीला सासरी घेऊन जात होता. ज्यावेळी तो बस स्टँडवर पोहोचला तेव्हा नवरीने आपल्याला तहान लागल्याचं सांगितलं. यानंतर राजू तिच्यासाठी पाणी आणण्यासाठी गेला.

नवी दिल्ली - देशात फसवणुकीच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर सासरी जाणाऱ्या नवरीने नवरदेवालाच गंडा घातल्याची घटना घडली आहे. नववधूने रस्त्यातच तहान लागल्याच कारण देत नवरदेवाला चकवा देत पळ काढला आहे. खूप शोधल्यानंतरही तिचा पत्ताच लागला नाही आणि या फसवणुकाची हा प्रकार उघड झाला. पीडित तरूण आणि त्याच्या वडिलांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून पसार झालेल्या नववधूचा शोध घेत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील करहल चौकात राहणाऱ्या तरुणीने कस्बा मार्गावर राहणाऱ्या तरुणासोबत लग्न केलं होतं. तरुण लग्न करून नवरीला घरी घेऊन जाण्यासाठी बस स्टँडवर पोहोचला. त्यावेळी तरुणी त्याला फसवून कॅश, ज्वेलरी घेऊन बेपत्ता झाली. या घटनेनंतर नवरदेवाला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी येथील एक व्यक्ती मुलीचं लग्नाचं स्थळ घेऊन आले होते. पीडित तरुणाचे वडील राजेंद्र यांनी लग्नासाठी परवानगी दिली. मात्र या लग्नात मुलीला 80 हजार रुपये द्यावे लागतील अशी अट घातली. दोघांनीही हे मान्य केलं. शहरातील करहल चौकाजवळ राहणाऱ्या एका महिलेने ठराविक रक्कम घेतल्यानंतर 17 ऑगस्ट रोजी तरुणीसोबत लग्न केलं. 

नवरी जोमात, नवरदेव कोमात! 

राजेंद्रने आपल्या सुनेला सोन्याचे दागिने दिले. लग्नानंतर सायंकाळी राजू आपल्या पत्नीला सासरी घेऊन जात होता. ज्यावेळी तो बस स्टँडवर पोहोचला तेव्हा नवरीने आपल्याला तहान लागल्याचं सांगितलं. यानंतर राजू तिच्यासाठी पाणी आणण्यासाठी गेला. परत येऊन पाहिलं तर नवरी गायब झाली होती. बराच शोध घेतल्यानंतरही तिचा शोध लागला नाही. यानंतर राजूचे वडील राजेंद्र यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. करहल रोड येथे राहणाऱ्या महिलेने धोका दिल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भयंकर! प्रेमात धोका मिळाल्याने प्रेयसीने काटा काढला; साखरपुड्याच्या दिवशी प्रियकराचा गळा चिरला

प्रेमात धोका मिळाल्याने एका प्रेयसीने टोकाचं पाऊल उचललं आहे. थेट प्रियकराचाच काटा काढला आहे. प्रियकराचं लग्न ठरल्यामुळे नाराज झालेल्या महिलेने त्याची हत्या केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली असून याचा अधिक तपास सुरू आहे. प्रेयसीने आपला भाऊ आणि त्याच्या दोन मित्रांच्या मदतीनं साखरपुड्याच्याच दिवशीच प्रियकराची गळा चिरून हत्या केली आहे. यानंतर महिलेने प्रियकराचा मृतदेह एका नाल्यात फेकून दिला होता. पण मृतदेह तरंगत बाहेर आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं आहे.  

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नPoliceपोलिस