वृद्धांना धक्का देत मोबाईल करायचे लंपास; कांदिवली पोलिसांकडून दुकलीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2021 21:04 IST2021-07-15T21:03:34+5:302021-07-15T21:04:28+5:30
Crime News :उपनगरातील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

वृद्धांना धक्का देत मोबाईल करायचे लंपास; कांदिवली पोलिसांकडून दुकलीला अटक
मुंबई: वृद्धांना जाणूनबुजून धक्का देत त्यांच्या खिशातील मोबाईल लंपास करणाऱ्या रिक्षा चालकासह त्याच्या साथीदाराला कांदिवली पोलिसांनी गुरुवारी अटक केली. त्यांच्यावर उपनगरातील अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
मंदिराच्या दिशेने देवदर्शनासाठी निघालेले बाबूभाई गोहिल (७७) याना एमजी रोडवर एका आरोपीने धक्का देत वाद सुरू केला. तर त्याचा साथीदार देखील त्याला साथ देत होता. या भांडणात त्यांनी गोहिल यांच्या गळ्यात हात घालून खिशातील मोबाईल काढला. तो घेऊन ते पसार झाल्यावर गोहिल यांनी याप्रकरणी कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. सीसीटीव्ही फुटेज आणि चोरीच्या मोबाईलची सेलसाईट तपासत पोलिसांनी मालवणी ककच्चा रस्ता येथुन दोघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून १ लाख ६५ हजारांचे ११ मोबाईल हस्तगत करण्यात आले. ते सराईत गुन्हेगार असुन त्यांच्यावर मालवणी, कांदिवली, वनराई आणि डी एन नगर पोलिसात गुन्हे दाखल आहेत.