शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

लोकायुक्त इन्स्पेक्टरचे तरुणासोबत ७ महिने ठेवले अनैसर्गिक शरीरसंबंध, पीडितेने बनवला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 21:00 IST

Unnatural Sex : पीडित तरुणाने वैतागून व्हिडिओ बनवला आणि पोलिसांत तक्रार केली.

ग्वाल्हेर  ग्वाल्हेरमध्ये लोकायुक्त  इन्स्पेक्टरचे लज्जास्पद कृत्य समोर आले आहे. इन्स्पेक्टरने नोकरीच्या बहाण्याने तरुणाचे शारीरिक अत्याचार केले. ७ महिने तो त्याच्यासोबत अनैसर्गिक सेक्स करत होता. पीडित तरुणाने वैतागून व्हिडिओ बनवला आणि पोलिसांत तक्रार केली.लोकायुक्त निरीक्षकाने एका तरुणाला नोकरीच्या बहाण्याने हॉटेलमध्ये नेऊन त्याच्याशी अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. लैंगिक छळ केलेल्या तरुणाला नोकरी तर दिली नाहीच, उलट धमकावून ७ महिने त्याचे शोषण केले. या अत्याचारातून सुटका करून घेण्यासाठी तरुणाने त्याच्या मित्रासोबत इन्स्पेक्टरचा व्हिडिओ बनवला. या व्हिडिओच्या मदतीने तरुणाने इन्स्पेक्टरविरोधात तक्रार केली. व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी आरोपी इन्स्पेक्टरविरुद्ध गैरवर्तन आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल केला आहे.नोकरीच्या नावाखाली फसवणूकयुनिव्हर्सिटी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरनुसार, ग्वाल्हेरच्या नाका चंद्रवदनी भागात राहणारा ३२ वर्षीय तरुण बेरोजगार आहे. पदवीनंतर हा तरुण नोकरीच्या शोधात होता. गेल्या वर्षी जुलैमध्ये एका मित्राने त्याची ग्वाल्हेर लोकायुक्तमध्ये तैनात इन्स्पेक्टर सुरेंद्र यादव यांच्याशी ओळख करून दिली. गेल्या वर्षी ५ जुलै रोजी इन्स्पेक्टर सुरेंद्र यांनी तरुणाला फोन करून रेल्वे स्टेशनजवळ बोलावले. येथून इन्स्पेक्टरने तरुणाला आपल्या कारमध्ये बसवले आणि सिटी सेंटर परिसरात असलेल्या हॉटेल लँडमार्कमध्ये नेले. हॉटेलच्या खोलीत नेऊन इन्स्पेक्टरने नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरुणासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवले. यानंतर इन्स्पेक्टर तरुणाला कधी हॉटेलमध्ये तर कधी त्याच्या खोलीत बोलावून त्याच्यावर अत्याचार करत होता. नोकरी न मिळाल्याने तरुणाने इन्स्पेक्टरपासून दूर राहण्याचा प्रयत्न केला, मात्र इन्स्पेक्टरने त्याच्या गणवेशाचा धाक दाखवून त्याला धमक्या देण्यास सुरुवात केली. शेवटी पीडितेने हा संपूर्ण प्रकार त्याच्या मित्राला सांगितला.मित्राने बनवलेला VIDEOइन्स्पेक्टर सुरेंद्र यादवने तरुणासोबत अनैसर्गिक सेक्स केल्यानंतर धमक्या देण्यास सुरुवात केली, तेव्हा पीडितेने आपल्या मित्राच्या मदतीने इन्स्पेक्टरच्या दुष्कृत्याचा व्हिडिओ बनवला. प्रथम व्हिडीओ इन्स्पेक्टरला दाखवून तक्रारीबाबत बोलले. सुरेंद्र यादवने पोलिसांच्या वर्दीत त्यांना धमक्या देण्यास सुरुवात केली. शेवटी तरुणाने VIDEO पाठवून पोलिस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्हिडिओच्या आधारे लोकायुक्त निरीक्षक सुरेंद्र यादव यांच्याविरुद्ध अनैसर्गिक लैंगिक संबंध आणि जीवे मारण्याच्या धमक्यांचा गुन्हा नोंदवला. एएसपी राजेश दंडौतिया यांनी सांगितले की, आरोपी लोकायुक्त निरीक्षकाविरुद्ध भादंवि कलम ३७७ आणि ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो फरार असून त्याचा शोध घेत लवकरच त्याला अटक करण्यात येईल.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळMadhya Pradeshमध्य प्रदेशPoliceपोलिस