लॉकडाऊनमध्ये चोरी करण्यासाठी घरात घुसला अन् वकील महिलेवर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 05:10 PM2020-05-23T17:10:49+5:302020-05-23T17:14:59+5:30

घरात एकट्या महिलेला पाहून त्या व्यक्तीने तिला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली, त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.

In the lockdown, Rape on a lady lawyer, robber enter into a house to steal pda | लॉकडाऊनमध्ये चोरी करण्यासाठी घरात घुसला अन् वकील महिलेवर केला बलात्कार

लॉकडाऊनमध्ये चोरी करण्यासाठी घरात घुसला अन् वकील महिलेवर केला बलात्कार

Next
ठळक मुद्देबलात्कारानंतर आरोपीने गळा दाबून पळ काढला होता. नंतर या महिलेचा मृत्यू झाल्याचे आरोपीला वाटले.आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संबंध देशात लॉकडाऊन आहे. मात्र, अशा परिस्थितीत गुन्हे आणि महिला अत्याचाराच्या घटनांत घट झालेली नाही. दिल्लीच्या जंगपुरा येथे एका वकील महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. चोरी करण्याच्या उद्देशाने आरोपीने प्रथम महिलाच्या घरात प्रवेश केला. घरात एकट्या महिलेला पाहून त्या व्यक्तीने तिला चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली, त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला.

बलात्कारानंतर आरोपीने गळा दाबून पळ काढला होता. नंतर या महिलेचा मृत्यू झाल्याचे आरोपीला वाटले. ही घटना शुक्रवारी घडली आहे. त्या व्यक्तीने महिलेला धमकावले होते की, तिने आवाज केला तर ती चाकूने वार करुन तिला ठार मारेन. सोनू असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर आरोपी एका सीसीटीव्हीमध्ये दिसला, त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपी सोनूने चौकशीत सांगितले की, त्याने चोरीच्या उद्देशाने त्या महिलेच्या घरात प्रवेश केला होता. जेव्हा त्याने महिलेला एकटे पाहिले तेव्हा त्याने बलात्काराची घटना घडवून आणली. बलात्कारानंतर त्याने महिला वकिलाची गळा आवळून हत्या केल्याचे आरोपीने सांगितले.

गळा आवळल्याने महिला बेशुद्ध पडली. महिला मृत असल्याचा आरोपीला भास झाला आणि त्यानंतर आरोपी महिलेचे डेबिट कार्ड, घरात ठेवलेली रोकड व काही महत्त्वाच्या वस्तू घेऊन फरार झाला. आरोपीवर आणखी गुन्हे नोंद आहेत. आरोपी सोनू हा तैमूर नगर, दिल्लीचा रहिवासी आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळापासून काही अंतरावर एका सीसीटीव्हीमध्ये आरोपी दिसला. चौकशीत महिलेने दिलेल्या वर्णनाच्या आधारे आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पीडित महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

कामगार नेते, जितेंद्र आव्हाड यांचे सासरे दादा सामंत यांची आत्महत्या

 

अल कायदाला आर्थिक मदत करणाऱ्या तेलंगणातील इंजिनिअरला भारताकडे सोपवले 

 

लाखोंची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Coronavirus : सामूहिक बलात्कारातील आरोपी निघाला कोरोनाग्रस्त; पीडितेसह मॅजिस्ट्रेटवर संकट

 

मुलीचे लग्न लागताच अरुण गवळीला न्यायालयाचा दणका; सरेंडर होण्याचे आदेश

 

माझ्याशी सेक्स चॅट कर, नाहीतर...; सहावीच्या मुलाची तरुणीला धमकी

 

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाने त्रस्त पतीने फेसबुकवर सुसाईट नोट लिहून संपवले आयुष्य 

Web Title: In the lockdown, Rape on a lady lawyer, robber enter into a house to steal pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.