शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येपूर्वी लिहिली भावाला Whats Appवर चिठ्ठी; पोलिसांच्या त्रासाला कंटाळून महिला पोलिसाने स्वतःला संपवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2021 17:46 IST

Suicide Case : रोजच्या मानसिक त्रासाला कंटाळून वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई तरुणीची पुण्यात राहत्या घरी आत्महत्या

वसई : मिरा भाईंदर वसई विरारपोलिस आयुक्तांलय अंतर्गत वसई झोन -३ मधील तुलिंज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या सततच्या जाचाला कंटाळून एका 26 वर्षीय महिला पोलीस शिपाई कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी पहाटे उघडकीस आला आहे. 

धक्कादायक म्हणजे संबंधित तरुणीने पुण्याच्या दौंड तालुक्यातील देलवडी स्थित आपल्या गावच्या राहत्या घरी गुरुवारी पहाटे गळफास लावून ही आत्महत्या केली. तुलिंज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या  वाल्मिक गजानन आहिरे या पोलीस कर्मचाऱ्याच्या सततच्या  मानसिक त्रासाला कंटाळून या पोलीस तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती आता समोर आल्यानं राज्यातील संपूर्ण पोलीस दलच हादरुन गेलं आहे.

दिपाली बापूराव कदम (२६) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या संदर्भात तिच्या भावाने यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावर आरोपी वाल्मिक आहिरे याच्यावर विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे संबंधित पोलिस तरुणीने आत्महत्येपूर्वी तिने आपल्या भावाला एक पोलीस कर्मचारी सातत्याने त्रास देत असल्याचे मेसेज केले होते. व आत्महत्ये पूर्वी चिठ्ठी देखील लिहिली होती अशी माहिती असून ,आता या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

वाल्मिक आहिरे हा वसई विरार पोलीस आयुक्तालंय झोन ३ मधील तुलिंज  पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहे.तर मृत दीपाली कदम ही वसईत माणिकपूर पोलीस ठाण्यात कार्यरत होती मात्र तीचे लग्न जमल्यानंतर ती दोन महिन्यांपासून सुट्टीवर होती असे माणिकपूर पोलिसांनी लोकमत ला सांगितलेदरम्यान दिपालीच्या भावाने यवत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिल्यानुसार, आरोपी वाल्मिक आहिरे विरोधात भारतीय दंड संहिता कलम 306,504,506 अन्वये यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे आता यवत पोलीस व वसई विरार पोलीस आयुक्तांलय या आरोपीविरुद्ध कशाप्रकारे कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

आरोपी विवाहित, फोन करुन वारंवार दायचा द्यायचा त्रास

दीपाली ही माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये पोलिस शिपाई म्हणून कार्यरत होती. दीड ते दोन महिन्यापूर्वी तिचे लग्न भोसरी येथील तरुणाशी ठरले होते. दरम्यान आरोपी वाल्मिक गजानन आहिरे हा दिपालीला वारंवार फोन करून मानसिक त्रास देत होता.याखेरीज तिचे लग्न जमल्यानंतर ही सासरच्या मंडळींना आरोपी वाल्मिक आहिरे याने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. धक्कादायक म्हणजे, आरोपी हा विवाहित होता. तरीही दीपालीला तो वारंवार त्रास देत होता. दीपालीच्या भावाने त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, त्याने त्यालाही उडवून लावत दमबाजी करून जीवे मारण्याची धमकी दिली.

टॅग्स :PoliceपोलिसDeathमृत्यूVasai Virarवसई विरारPuneपुणेWhatsAppव्हॉट्सअ‍ॅप