बलात्कार प्रकरणात नेत्याच्या मुलाला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 02:07 IST2023-08-27T02:06:56+5:302023-08-27T02:07:06+5:30

उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील परतापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

Leader's son shackled in rape case | बलात्कार प्रकरणात नेत्याच्या मुलाला बेड्या

बलात्कार प्रकरणात नेत्याच्या मुलाला बेड्या

मेरठ : एका मुलीच्या तक्रारीवरून बहुजन समाज पक्षाचे (बीएसपी) माजी खासदार शाहिद अखलाक यांचा मुलगा दानिश याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या मेरठ जिल्ह्यातील परतापूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
ब्रह्मपुरीच्या सर्कल ऑफिसर (सीओ) शुचिता सिंह यांनी शनिवारी सांगितले की, अखलाक यांचा मुलगा दानिश याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता (आयपीसी) कलम ३७६ (बलात्कार)अंतर्गत परतापूर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा दानिशच्या घरावर छापा टाकत त्याला अटक केली. पोलिसांनी दानिशचा मोबाइल फोनही जप्त केला असून, हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेज पोलिस तपासत आहेत. लग्नाच्या बहाण्याने मेरठमधील एका हॉटेलमध्ये बोलावून माजी खासदाराच्या मुलाने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप मुलीने केला आहे. यानंतर मेरठ पोलिसांनी ही कारवाई केली.

Web Title: Leader's son shackled in rape case