शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
7
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
8
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
9
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
10
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
11
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
12
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
13
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
14
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
15
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
16
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
17
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
18
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
19
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

ले साले दारू पी...म्हणत झाले दारुड्या मित्रांमध्ये कडक्याने भांडण अन् हाणला हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2020 15:07 IST

कारागृहातून आला आणि मित्राची हत्या केली, दोन कुख्यात गुंडांना अटक

ठळक मुद्दे  सुरेंद्र तभाने हा शांतीनगरात राहत होता. तो गावोगावच्या आठवडी बाजारात जाऊन समोसा चिवडा विकायचा शांती नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच साईबाबा नगरात आरोपी राहतात.नेहमीप्रमाणे आज दुपारी एकच्या सुमारास सुरेंद्र तसेच आरोपी कलवा आणि बाबा हे तिघे दारू पीत बसले.

नागपूर - नुकताच कारागृहातून जमिनीवर बाहेर आलेल्या एका कुख्यात गुंडाने त्याच्या साथीदाराच्या मदतीने क्षुल्लक कारणावरून एका व्यक्तीची हातोड्याने हत्या केली. शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज दुपारी १ च्या सुमारास ही घटना घडली. सुरेंद्र सुखदेव तभाने (वय ३२) असे मृतकाचे नाव आहे. तर त्याची हत्या करणाऱ्या आरोपींची नावे कलवा उर्फ दीपक सोनी आणि बाबा पण्णी अशी आहेत हे दोघेही गुंड आहेत. ते कोरोनामुळे नुकतेच कारागृहातुन बाहेर आले आणि त्यांनी गुन्हेगारी सुरू केली. दारू पिताना सुरेंद्र याने आरोपी कलवा याला ले साले दारू पी... असे म्हणून त्याच्या ग्लासमध्ये दारू ओतली. कलवा याने शिवीगाळ केल्यामुळे पोलीस ठाण्यात रिपोर्ट देण्याचा धाक दाखविला. त्यामुळे कलवा आणि पन्नीने सुरेंद्रची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. सुरेंद्र तभाने हा शांतीनगरात राहत होता. तो गावोगावच्या आठवडी बाजारात जाऊन समोसा चिवडा विकायचा शांती नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच साईबाबा नगरात आरोपी राहतात. सुरेंद्र याची आरोपी दीपक सोनी तसेच बाबा पन्नीसोबत मैत्री होती. ते नेहमी एकत्र बसून दारू प्यायचे.  नेहमीप्रमाणे आज दुपारी एकच्या सुमारास सुरेंद्र तसेच आरोपी कलवा आणि बाबा हे तिघे दारू पीत बसले. ते पाहून सुरेंद्रचा मोठा भाऊ नरेंद्र याने या तिघांना हटकले. घरासमोरदारू पीत बसने योग्य नाही, लहान मुले बघतात, असे म्हणून त्यांना येथून जाण्यास सांगितले. त्यामुळे आरोपी सुरेंद्रला जबरदस्तीने बाजूला असलेल्या नाल्याजवळ घेऊन गेले आणि दारू पीत बसले. काही वेळानंतर त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे दारू पिता पिताच आरोपीने सुरेंद्रच्या डोक्यावर हातोडा आणि दगडाने मारणे सुरू केले. ते पाहून बाजूला खेळणारी मुले आरडाओरड करत तभाने यांच्या घरी आली. त्यांनी नरेंद्र यांना तुझ्या भावाला आरोपी कलवा आणि बाबा पण्णी हातोड्याने मारत असल्याचे सांगितले. त्यामुळे नरेंद्र धावतच गेले. त्याने कलवा याला पकडून दोन ठोसे लगावले. त्याच्या हातून हातोडा हिसकावून घेतला. त्यामुळे कलवाने चाकू काढला मात्र नरेंद्रने प्रतिकार केल्यामुळे आरोपी कलवा तसेच बाबा पनी दोघेही तिथून पळून गेले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुरेंद्रला त्याच्या भावाने उचलण्याचा प्रयत्न केला. मात्र तो निपचीत पडून होता. त्यामुळे नरेंद्र शांतीनगर पोलीस ठाण्यात गेले. तेथून त्यांनी पोलिसांसोबत घटनास्थळ गाठले. सुरेंद्रला उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.परिसरात थरार

भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला. पोलिसांनी नरेंद्र चव्हाण यांची तक्रार नोंद घेत आरोपी कलवा उर्फ दीपक सोनी असेच बाबा पन्नीविरुद्ध गुन्हा दाखल करून रात्री त्यांना अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

पोलिसांचा असा घेतला बदला; क्वारंटाईन सेंटरच्या पाण्याच्या टाकीत विष मिसळले

 

थरारक हत्याकांड! सपासप चाकूने वार करून चिमुकलीचा आईने घेतला जीव नंतर संपविले स्वतःला  

 

Ajay Pandita Murder : भ्याड दहशतवाद्यांनो! हिम्मत असेल समोर या, मी तुम्हाला सोडणार नाही

 

खोट्या प्रेमाचं कडवट सत्य, तरुणीच्या शरीराचे तुकडे तुकडे करून केली हत्या 

टॅग्स :MurderखूनnagpurनागपूरPoliceपोलिस