शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

नक्षलवाद्यांचा मोठा कट उधळला, पोलिसांनी जंगलात लपवून ठेवलेली स्फोटके-शस्त्रे केली जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 20:33 IST

A large plot of Naxals was foiled : पोलिसांनी शस्त्रे जप्त केली आहेत. जमुईचे एसपी प्रमोद कुमार मंडल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे नक्षलवादी बांधकामाधीन पूल आणि रस्त्याचे नुकसान करण्याच्या तयारीत होते.

जमुई - बिहारमध्ये मोठी घटना घडवून आणण्याचा नक्षलवाद्यांचा कट उधळून लावत जमुई पोलिसांनी शनिवारी जंगलात लपवून ठेवलेली मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली. झाझा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील  जुडपनिया जंगलात नक्षलवाद्यांचा एक गट जमा होत असल्याची माहिती जमुई पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी शस्त्रे जप्त केली आहेत. जमुईचे एसपी प्रमोद कुमार मंडल यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे नक्षलवादी बांधकामाधीन पूल आणि रस्त्याचे नुकसान करण्याच्या तयारीत होते.पोलीस अधीक्षकांनी सांगितले की, २१५ सीआरपीएफचे योगेंद्र सिंह मौर्य, पोलीस उपअधीक्षक ऑपरेशन सुधांशु कुमार, उप कमांडंट सीआरपीएफ २१५ संदीप कुमार, सीआरपीएफ २१५ चे सहाय्यक कमांडर अमर राज, एसटीएफचे उपनिरीक्षक बैकुंद आणि झाझा पोलिस स्टेशनच्या नेतृत्वाखाली  पुअनि वीरभद्र कुमार सिंह, सअनि दिलीप कुमार चौधरी यांच्या दलासमवेत गट तयार करण्यात आला.त्यांनी सांगितले की, जुडपनिया जंगल परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली. शोध मोहिमेदरम्यान, जुडपनिया गावातील राखा बटको जंगलात जमिनीखाली संशयास्पद परिस्थितीत लपवून ठेवलेले प्लास्टिकचे ड्रम सापडले, ते उघडले असता, 100 किलो अमोनियम नायट्रेट आणि जवळच देशी बनावटीचा  मास्ककेट  आणि देशी बनावटीचा कट्टा जप्त करण्यात आला. झाझा पोलिस ठाण्यात या प्रकरणाचा खुलासा करताना एसपींनी सांगितले की, या घटनेत नक्षलवादी पिंटू राणा याच्या टोळीचा हात आहे. त्यांच्या मते, यापूर्वी नक्षलवादी प्रकरणात तुरुंगवास भोगलेल्या विजय कुमारचे या घटनेत नवीन नाव येत आहे. विजय हा स्फोटक डिलिव्हरी करत होता.एसपीच्या म्हणण्यानुसार, सध्या पोलिस नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नक्षलवाद्यांविरोधात त्यांच्या स्तरावर कारवाई करत राहतील आणि सध्या या प्रकरणात जी काही नाव समोर येतील, त्यावर एफआयआर नोंदवला जाईल.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीBiharबिहारPoliceपोलिसArrestअटक