शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीचा वाद आणि तिहेरी हत्याकांड! लहान भाऊ, वहिनी आणि पुतणीचे कुऱ्हाडीने केले तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 14:58 IST

जमिनीच्या वादातून मोठ्या भावाने लहान भाऊ, त्याची पत्नी आणि मुलगी अशा तिघांची हत्या केली. या तिहेरी हत्याकांडाने संपूर्ण गाव हादरले. 

लहान भाऊ, त्याची पत्नी आणि त्याच्या मुलीची मोठ्या भावाने कुऱ्हाडीने घाव घालत हत्या केली. कुऱ्हाडीनेच त्यांचे तुकडे केले. तिहेरी हत्याकांडाची वार्ता गावभर पसरली आणि सगळे गाव हादरले. ओडिशातील क्योंझर जिल्ह्यातील आनंदपूर भागात असलेल्या नियालिझरन गावात ही घटना घडली आहे. 

पोलिसांनी सांगितले की, रविवारी रात्री तिघांची हत्या करण्यात आली. प्राथमिक तपासातून जमिनीच्या वादातून तिघांना मारण्यात आल्याचे समोर आले आहे. 

जमिनीचा वाद, कुऱ्हाडीने हल्ला

पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार लक्ष्मण सोरेन याने त्याचा छोटा भाऊ जितेंद्र सोरेन, जितेंद्रची पत्नी आणि त्याची मुलगी यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. कुऱ्हाडीचे घाव घालत तिघांची हत्या केली. 

कुटुंबात बऱ्याच काळापासून वाद सुरु आहेत. जमिनीच्या मुद्द्यावरून वाद असून, गेल्या काही काळात तो वाढला होता. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या जमिनीच्या वादात तिघांची हत्या करावी, असे काय घडले, हे अद्याप समोर आलेले नाही. 

गावातील लोकांनी सांगितले की, भावांमध्ये संपत्तीच्या अधिकारावरून वाद सुरू होता. हा वाद दिवसेंदिवस वाढत होता. त्यानंतर रविवारी रात्री मोठ्या भावाने छोट्या भावाचे पूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त केले. 

पोलिसांनी दोघांना घेतले ताब्यात

माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी लक्ष्मण सोरेन याला ताब्यात घेतले. लक्ष्मण सोरेन याच्या चौकशीतूनच तिघांच्या हत्येच्या कारणाचा उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले. 

आनंदपूर उप विभागीय पोलीस अधिकारी कमल पांडा यांनी सांगितले की, आम्ही दोन लोकांना ताब्यात घेतले आहेत. यात एक मुख्य आरोपी आहे. एक कुटुंबातील नातेवाईकही आहे. सुरूवातीच्या तपासातून माहिती मिळाली आहे की, दीर्घकाळापासून सुरू असलेल्या जमीन वादात ही घटना घडली आहे. आम्ही इतर अंगानेही या प्रकरणाचा तपास करत आहोत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Land Dispute Turns Deadly: Brother Kills Family with Axe

Web Summary : In Odisha, a land dispute led to a horrific triple murder. A man killed his brother, sister-in-law, and niece with an axe. Police arrested the suspect and are investigating the long-standing property feud.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसOdishaओदिशा