शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

लकडावालाने खाल्ली बिर्याणी; दोन पोलिसांचे निलंबन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 16:19 IST

दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे समोर आले आहे. 

ठळक मुद्दे युसुफ लकडावालाने खालेली बिर्याणी आर्थिक गुन्हे शाखेतील (इओडब्ल्यू) दोन पोलीस अधिकाऱ्यांना महागात पडली. इओडब्ल्यूच्या पोलिसांनी लकडावाला याला त्यांच्या कार्टर रोड येथील घरी नेले होते. या प्रकरणी वरिष्ठांनी पोलीस कर्मचारी विलास राठोड आणि संदीप सावंत या दोन अधिकाऱ्यांवर निलंबंनाची कारवाई करण्यात आली आहे. 

मुंबई - खंडाळा येथे ५० कोटी रुपयांच्या जमिन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावालाने खालेली बिर्याणी आर्थिक गुन्हे शाखेतील (इओडब्ल्यू) दोन पोलीस अधिकाऱ्यांना महागात पडली. दरम्यान, कायदेशीर कारवाईसाठी लकडावालाला घरी नेण्यात आले होते. त्यानंतर घरी बिर्याणी खाण्यास आणि दाढी करण्यास परवानगी दिल्याने दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचे समोर आले आहे. 

बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने खंडाळा येथील चार एकर (५० कोटी किंमतीची) जमीन बळकवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली बांधकाम व्यावसायिक युसुफ लकडावालाविरोधात (७४)  गुन्हा नोंदवण्यात आला होता. या गुन्ह्यात लकडावाला देशसोडून लंडनला पळ काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी गुजरातमधून त्याला अटक करण्यात आली. लकडावालाने मावळ येथील दुय्यम निबंधक कार्यालयात बनावट कागदपत्र दाखल केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. याप्रकरणी दुय्यम निबंधक कार्यालयाकडूनच इओडब्ल्यूकडे तक्रार करण्यात आली होती. 

या गुन्ह्यात कागदोपत्री तपासासाठी दोन दिवसांपूर्वी इओडब्ल्यूच्या पोलिसांनी लकडावाला याला त्यांच्या कार्टर रोड येथील घरी नेले होते. घरात पोलिसांची झाडाझडती सुरू असताना लकडावालाच्या कुटुंबियांनी त्याला बिर्याणी खाण्यास देण्याची विनंती केली. त्यानुसार दोन्ही अधिकाऱ्यांनी त्याला बिर्याणी खाण्यास परवानगी दिली. याच दरम्यान लकडावाला शौचालयात गेला असता. त्याने चेहऱ्यावर उगवलेली दाढीही काढली. इओडब्ल्यूच्या कार्यालयात आणल्यानंतर लकडावालाच्या चेहऱ्यावर उगवलेली दाढी वरिष्ठांना दिसली नाही. त्यावेळी चौकशीत हा सर्व प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी वरिष्ठांनी पोलीस कर्मचारी विलास राठोड आणि संदीप सावंत या दोन अधिकाऱ्यांवर निलंबंनाची कारवाई करण्यात आली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsuspensionनिलंबनPoliceपोलिसEconomic Offence Wingआर्थिक गुन्हे शाखा