तुर्भे गाव येथून लाखोंचा गुटखा जप्त; एकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 20:03 IST2019-12-19T20:01:29+5:302019-12-19T20:03:26+5:30
हा गुटखा अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला आहे.

तुर्भे गाव येथून लाखोंचा गुटखा जप्त; एकास अटक
नवी मुंबई - कृष्णा निवास इमारतीमधील मे. जैन स्टोअर्स या गोडाऊनमध्ये हा गुटखा साठवलेला होता. याप्रकरणी व्यवसायिक विनोदकुमार जैन (४४) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. जप्त केलेला गुटखा १४ लाख ४३ हजार ८०० रुपये किंमतीचा आहे. त्यामध्ये विमल पान मसाला, महक सुपर पान मसाला तसेच इतर प्रतिबंधित गुटख्याचा समावेश आहे. हा गुटखा अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सदर कारवाई परिमंडळ उपायुक्त पंकज डहाणे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जी. डी. देवडे, हवालदार अर्चना कारखिले, संजय ठाकूर, विद्याधर कामडी, गणेश चौधरी, सागर सोनावणे आदींच्या पथकाने केली आहे.