लघु उद्योगाचे आमिष दाखवून १४ महिलांना लावला लाखोंचा चुना 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 09:29 PM2020-11-26T21:29:44+5:302020-11-26T21:30:13+5:30

Fraud : सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

lakhs of rupees duped of 14 women by showing the lure of small scale industries | लघु उद्योगाचे आमिष दाखवून १४ महिलांना लावला लाखोंचा चुना 

लघु उद्योगाचे आमिष दाखवून १४ महिलांना लावला लाखोंचा चुना 

Next
ठळक मुद्देयाबाबत वत्सला रमेश पाटील (५९,रा.आदर्श नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संगीता नीरज जोशी, नीरज जोशी व जागृती जोशी हे १५ वर्ष वत्सला पाटील यांच्या घरात भाड्याने वास्तव्याला होते

जळगाव : लघु उद्योग सुरु करण्यासह पैशाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या नावाने बचत गट स्थापन करुन १४ महिलांची १३ लाख ५० हजार २५० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी संगीता नीरज जोशी, नीरज जोशी, जागृती नीरज जोशी, संतोष जयनारायण शर्मा व संजय जयनारायण शर्मा (सर्व रा.सांगवी, ता.शिरपुर, जि.धुळे) यांच्याविरुध्द गुरुवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत वत्सला रमेश पाटील (५९,रा.आदर्श नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संगीता नीरज जोशी, नीरज जोशी व जागृती जोशी हे १५ वर्ष वत्सला पाटील यांच्या घरात भाड्याने वास्तव्याला होते, त्यामुळे त्यांचे घरोब्याचे संबंध होते. या संबंधातून सून कामिनी रामकृष्ण पाटील यांच्याकडून जोशी परिवाराला मेडीकल दुकानातील साहित्यासाठी १५ हजार रुपये दिले होते, ही बाब सासूला माहित नव्हती, त्यानंतर संगीता जोशी हिने पुन्हा वत्सला पाटील यांच्याकडून त्याच कामासाठी ५ जुलै २०१९ रोजी ५० हजार रुपये घेतले. पुन्हा त्याच कारणासाठी ७ डिसेंबर २०१९ रोजी अडीच तोळ्याचे सोन्याचे लॉकेट खासगी फायनान्स येथे तारण ठेवून ६४ हजार ३७५ रुपये संगीता जोशी हिने घेतले. त्यासाठी जोशी हिचा भाचा अंकीत शर्मा याने ५० व ४० हजाराचे दोन धनादेश दिले. आमच्याकडे पेट्रोल पंप असून खूप पैसे आहेत, तुम्हाला रोख पैसे देऊ, तुम्ही धनादेश बँकेत टाकू नका असे सांगितले. त्यामुळे पाटील यांनी हे धनादेश बँकेत जमा केले नाहीत.त्यानंतर फेब्रवारी २०२० मध्ये जोशी परिवार घराला कुलुप लावून निघून गेले. त्यानंतर त्यांनी महिलांना उद्योग देण्याच्या नावाखाली महिलांच्या नावावर वेगवेगळ्या फायनान्सकडून कर्ज काढले व त्यांची फसवणूक केली.


यांची झाली फसवणूक
वत्सला रमेश पाटील (रा.आदर्श नगर),कामिनी रामकृष्ण पाटील (रा.आदर्श नगर),रत्ना ज्ञानेश्वर बारी (रा.मकरा पार्क), संध्या दिलीप घोडेस्वार (रा.मकरा पार्क), मथुराबाई भरतसिंग भोपाळावद (रा.मोहाडी रोड), कल्पना विजय नाथ (रा.शिरसोली नाका), कामिनी रामकृष्ण पाटील (रा.मकरा पार्क), सुवर्णा भुपेंद्र वानखेडे (रा.मकरा पार्क), विजया भास्कर वानखेडे (रा.मकरा पार्क), सायराबी समीर पठाण (रा.आदर्श नगर), रोशन बी शब्बीर खान (रा.शिरसोली नाका), आरेफा बी युनुस खा पठाण (रा.आदर्श नगर), सीमा चंद्रकांत सोनवणे (रा.शिरसोली रोड) व फैमादाबी शाकीर खा पठाण (रा.आदर्श नगर) आदींची एकूण १३ लाख ५० हजार २५० रुपयात फसवणूक झाली आहे. वेगवेगळ्या बचत गटाच्या नावाने वेगवेगळ्या फायनान्सकडून त्यांनी या महिलांच्या नावाने कर्ज काढून स्वत: लाटले आहे.

 

उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यात एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. येथे सहजनवान पोलिस स्टेशन परिसरातील घाससरा चौकी प्रभारी पोस्टमधील एक अल्पवयीन मुलगा व मुलगी मदत व लग्न मिळवून देण्यास प्रभारी आहे. आत्तापर्यंत तो दोघेही प्रौढ असल्याच्या व्हिडिओचा संदर्भ देत होते, पण आता काही कागदपत्रे समोर आल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आणि मुलीला ताब्यात घेतले. दुसरीकडे एसएसपीने संपूर्ण प्रकरणाची चौकशी एएसपीकडे सोपविली आहे. तपासाच्या आधारे कारवाई केली जाईल असे एसएसपीचे म्हणणे आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दिवाळीपासूनच एक मुलगी घरातून बेपत्ता होती. नंतर तिने प्रियकरासह पोलिस चौकी गाठली असल्याचे उघड झाले. त्या दोघांनीही म्हटलं होतं की ते प्रौढ आहेत. असा आरोप आहे की चौकी प्रभारीने दोघांचे लग्न केले. जेव्हा मुलीच्या आईने पोलिसात अल्पवयीन मुलीचा पोस्टमध्ये लग्न केल्याचा आरोप केला तेव्हा ही बाब अधिका the्यांपर्यंत पोहोचली. त्या इन्स्पेक्टरने कागदपत्रे मागितली होती, जेणेकरून ती मुलगी प्रौढ आहे की नाही याची पुष्टी केली जाऊ शकते, परंतु असे दिसून आले की तिने आपला अभ्यास सोडला आहे, ज्यामुळे कागदपत्रे सापडली नाहीत. जुन्या कागदपत्रांच्या आधारे पोलिसांनी त्याच्यावर अल्पवयीन असल्याचा गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एसएसपी जोगेंद्र कुमार यांनी सांगितले की कागदपत्रे मागितली गेली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुलीला तिच्या घरी रहायचे नाही. वैद्यकीय त्याचे वय निश्चित करेल. ती वयस्क असल्यास, त्यानुसार पोलिस कारवाई करतील, परंतु एखादी अल्पवयीन असल्यास आरोपींविरूद्ध कठोर कारवाई केली जाईल. एएसपी पोलिसांच्या भूमिकेचा शोध घेत आहेत.

Web Title: lakhs of rupees duped of 14 women by showing the lure of small scale industries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.