हेल्थ पॉलिसीच्या नावाखाली लाखांचा गंडा, अनोळखी व्यक्तींविरोधात पोलिसांत गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 17:45 IST2025-02-06T17:45:37+5:302025-02-06T17:45:59+5:30

याप्रकरणी अनोळखी मोबाईलधारकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Lakhs of rupees embezzled in the name of health policy, police register case against unknown persons | हेल्थ पॉलिसीच्या नावाखाली लाखांचा गंडा, अनोळखी व्यक्तींविरोधात पोलिसांत गुन्हा

हेल्थ पॉलिसीच्या नावाखाली लाखांचा गंडा, अनोळखी व्यक्तींविरोधात पोलिसांत गुन्हा

मुंबई : बँकेच्या पॉलिसीचा बनावट लोगो, ई-मेल आयडी बनवत पॉलिसी नूतनीकरण करण्यात सूट देण्याचे प्रलोभन दाखवत ग्राहकाकडून पैसे उकळल्याचा प्रकार बांगूरनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला. याप्रकरणी अनोळखी मोबाईलधारकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

१० टक्के सवलतीचे प्रलोभन
आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या मालाडमधील शाखेतील उपाध्यक्ष विशाल काटकर यांच्या तक्रारीनुसार डिसेंबरमध्ये अभिषेक सिंग व त्याच्या साथीदारांनी आरोग्य विमा पॉलिसीचे ग्राहक सुबोध गुलाटी यांना पॉलिसीच्या नूतनीकरणामध्ये १० टक्के सवलत देण्याचे प्रलोभन दाखविले.

बनावट ई-मेल आयडीमार्फत त्यांच्याकडून दोनदा व्यवहार करत एकूण एक लाख ८० हजार ५९३ रुपये उकळले. याप्रकरणी काटकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी मोबाईलधारकांविरोधात बीएनएस कायद्याचे कलम ३१९(२), ३३६(२), ३१८(४), ३३६(३), ३३८, ३४०, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६ (सी), ६६ (ड) अंतर्गत गुन्हा नोंदविला.

Web Title: Lakhs of rupees embezzled in the name of health policy, police register case against unknown persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.