कुरार पोलीस ठाण्याच्या हवालदाराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 04:59 IST2019-02-05T04:58:52+5:302019-02-05T04:59:07+5:30

शाळकरी विद्यार्थिनीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करण्यात आला. सोमवारी सकाळी हा प्रकार मालाडमध्से घडला. या प्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात कार्यरत एस. परब (५०) या हवालदारावर अटक करण्यात आली.

 Kural police station's constables arrested | कुरार पोलीस ठाण्याच्या हवालदाराला अटक

कुरार पोलीस ठाण्याच्या हवालदाराला अटक

मुंबई : शाळकरी विद्यार्थिनीला रस्त्यात अडवून तिचा विनयभंग करण्यात आला. सोमवारी सकाळी हा प्रकार मालाडमध्से घडला. या प्रकरणी कुरार पोलीस ठाण्यात कार्यरत एस. परब (५०) या हवालदारावर अटक करण्यात आली.
परब हा मालाडच्या पश्चिम द्रुतगती मार्गावर असलेल्या अदानी इलेक्ट्रिसिटी कार्यालयासमोर असणाऱ्या पोलिसांच्या पेट्रोलिंग व्हॅनवर कर्तव्यास होता. पीडित मुलगी पूजा (नावात बदल) ही कुरारमध्ये राहते. रोज शाळेतून येता-जाता परब हा पूजाला पाहून अश्लील शेरेबाजी करायचा. मात्र पूजा दुर्लक्ष करायची. सोमवारी ती शाळेत निघाली असताना परबने तिला पुन्हा बोलावले. पूजा त्याच्याजवळ गेली तेव्हा त्याने तिला घट्ट पकडले. तेव्हा पूजा घाबरली. आरडाओरड करीत तिने तिथून पळ काढला आणि घरी पोहोचली. तिने पालकांना घडलेला प्रकार सांगितला. संतप्त पालकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलीस ठाण्यात फोन करत तक्रार केली. पूजाचे पालक, शेजाºयांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घातला. कुरार पोलिसांनी परबवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केल्याचे वरिष्ठ अधिकाºयांकडून सांगण्यात आले.

Web Title:  Kural police station's constables arrested